छगन भुजबळांना गोळी मारली जाईल, पोलिसांचा रिपोर्ट; विधानसभेत खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यात मराठा आरक्षणाला छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवल्यामुळे मनोज जरांगे पाटील भुजबळांवर शाब्दिक वार करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे, मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्यापासून छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. याबाबतचा खुलासा आज स्वतः भुजबळ यांनी नागपूर अधिवेशनात केला आहे.

आज नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. यावेळी बोलताना, “माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही, परंतु ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये,” असे मत छगन भुजबळ यांनी मांडले. यानंतर त्यांनी आपल्याला देण्यात येत असलेल्या धमक्यांचा खुलासा देखील अधिवेशनामध्ये केला. पुढे भुजबळांनी पोलिसांकडून आलेला एक रिपोर्ट दाखवत आपल्याला गोळी मारली जाईल अशी ही धमकी आली असल्याचे सांगितले. ज्यामुळे सभेत गोंधळ उडाला.

दरम्यान, मराठा आरक्षणाला छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवल्यापासून जरांगे पाटील आणि मराठा समाजाने भुजबळांविरोधात आक्रमकाची भूमिका घेतली आहे. तसेच, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज हिवाळी अधिवेशनामध्ये छगन भुजबळ यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. तसेच “मी मरण्यास तयार आहे. मला गोळी घाला. पण माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. माझा झुंडशाहीला विरोध आहे” असे भुजबळांनी म्हणले.