रस्ते अपघातांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ झालेली दिसून येत असतानाच छत्रपती संभाजी नगर मधून आणखी एक मोठ्या अपघाताची बातमी समोर येत आहे. उसाने भरलेल्या ट्रक चा मोठा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या घटनेमध्ये आत्तापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना रात्री बारा ते एक यादरम्यान घडली असल्याचे बोलले जात आहेत तसंच कन्नड पिसोर रस्त्यावर ह्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उसाने भरलेल्या ट्रकवर 17 मजूर बसून चालले होते. त्यावेळी अचानक ट्रक पलटी झाला आणि त्यामुळे मजूर उसाखालील दाबले गेले. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे कोणतीही मदत यांना मिळू शकली नाही आणि त्यामुळेच या घटनेमध्ये 6 मजुरांचा मृत्यू झाला असून जखमी झालेल्या 11 मजुरांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमी झालेल्या व्यक्तींवर सध्या उपचार सुरू असून ही घटना नेमकी कशी झाली याचा तपास आता पोलीस करत आहेत.
मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे
प्राप्त झालेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये
किसन धनु राठोड
मनोज नामदेव चव्हाण
विनोद नामदेव चव्हाण
मिथुन महारु चव्हाण
कृष्णा मूलचंद राठोड सर्व राहणार सातकुंड
ज्ञानेश्वर देविदास चव्हाण राहणार बेलखेडा असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे असल्याची माहिती समोर आली आहे.