छत्रपती शिवाजी महाराजांची कृषी धोरणे नेमकी कशी होती?

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती असून, हि जयंती सर्व ठिकाणी उत्साहात आणि श्रद्धेने साजरी केली जाते. शिवाजी महाराजांचे शौर्य आणि कर्तृत्व केवळ सैन्याच्या लढाया आणि स्वराज्य स्थापनेपुरतेच मर्यादित नव्हत्या , तर त्यांनी आपल्या कृषी धोरणांद्वारे शेतकऱ्यांना उत्तेजन आणि सशक्तीकरण दिले.

कृषीला एक नवी दिशा –

शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्यांचे महत्त्व वाढवून, त्यांच्या आर्थिक स्थितीला स्थिरता देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यांचे सैन्य फक्त योद्ध्यांनी भरलेले नव्हते, तर शेतकऱ्यांच्या मदतीनेही सशक्त बनले होते. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे दिली, शेतकऱ्यांचे महसूल कमी केले आणि त्यांच्या दृष्टीकोनातून कृषीला एक नवी दिशा मिळाली . तसेच शेतकऱ्यांना योग्य जमीन आणि साधनसामग्री पुरवण्यात आली, ज्यामुळे शेतीला प्रोत्साहन मिळाले. जमिनीच्या मोजणीच्या नव्या पद्धती स्वीकारल्या गेल्या , ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळाले. महसूल सुद्धा एका ठराविक प्रमाणावर ठरवण्यात आला होता, यामुळे शेतकऱ्यांना अधिक न्याय मिळू शकला.

शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला –

शिवाजी महाराजांनी संकटाच्या काळात, विशेषत: दुष्काळ आणि अवर्षणाच्या वेळी, शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. तगाईची रक्कम चार ते पाच वर्षांमध्ये परत करण्याची मुभा देऊन शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता दिली. तसेच 19 मे 1673 रोजी लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराजांनी सैन्याला शेतकऱ्यांकडून गवत आणि भाजीपाला योग्य दराने खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. आजच्या काळात, महाराष्ट्रातील शेतकरी विविध संकटांना तोंड देत आहेत. सोयाबीन, दूध, आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणांचा अभ्यास आणि त्यांच्या कामाचा आदर्श शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो.