जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना; एकनाथ शिंदेची मोठी घोषणा

Chief Minister Tirtha Darshan Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना असं या योजनेचं नाव असून या योजनेच्या माध्यमातून सरकार स्वतः ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार आहे. आज राज्य विधिमंडळात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (Chief Minister Tirtha Darshan Yojana) सुरू करावी याबाबतची लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली. याला इतर आमदारांनी दुजोराही दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही योजना राज्यात लागू करत असल्याची घोषणा केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शनाला जाण्याची इच्छा असते, पण आर्थिक स्थिती नसल्याने इच्छा असूनही अनेकजण देवदर्शन करू शकता नाहीत त्यामुळे ही योजना लागू केल्यास ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन करता येईल, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली होती. या लक्षवेधीवर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना लागू करत असल्याचे म्हटलं. आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण ठरवलं जाईल, नियमावली केली जाईल, खर्च आणि इतर गोष्टी सुद्धा बघू. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवू असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना हि सर्व धर्मीयांसाठी असेल. आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत. आमच्या सरकारने शेतकऱ्यासांठी निर्णय घेतला. वारकऱ्यांसाठीही निर्णय घेतला असेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटल.