दिल्ली प्रतिनिधी । एअर मार्शल आर. के . एस भदौरिया यांची हवाई दलाच्या प्रमुखपदी केंद्राकडून नियुक्ती करण्यात आली. ते देशाचे २६ वे हवाई दल प्रमुख असतील. एअर मार्शल भदौरिया १५ जून १९८० मध्ये हवाई दलात दाखल झालेत. त्यांनी २६ विविध प्रकारच्या लढाऊ विमानांचे एकूण ४२५० तास उड्डाण केले आहे. त्याच प्रमाणे हवाई दलातील कमांड प्रमुख व इतर प्रशासनातील अनेक पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.
एअर मार्शल भदौरिया यांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरी नुसार परम विशिष्ट सेवा मेडल (PVSM), अति विशिष्ट सेवा मेडल (AVSM), वायु सेना मेडल (VM) व ADC यांचा बहुमान मिळाला आहे. ते सध्याचे हवाई दल प्रमुख बि.एस. धनोआ यांची जागा घेतील. धनोआ हे ३० सप्टेंबर रोजी या पदावरुन निवृत्त होत आहेत.
Air Mshl RKS Bhadauria PVSM AVSM VM ADC will take over as 26th Chief of the Air Staff.
HeAir Mshl RKS Bhadauria PVSM AVSM VM ADC will take over as 26th Chief of the Air Staff.
He will be taking over the command from the Chairman Chiefs of Staff Committee & Chief of the Air Staff, Air Chief Mshl BS Dhanoa PVSM AVSM YSM VM ADC, who is due to retire end of the month. pic.twitter.com/8uWevAGMpD— Indian Air Force (@IAF_MCC) September 19, 2019
will be taking over the command from the Chairman Chiefs of Staff Committee & Chief of the Air Staff, Air Chief Mshl BS Dhanoa PVSM AVSM YSM VM ADC, who is due to retire end of the month. pic.twitter.com/8uWevAGMpD
— Indian Air Force (@IAF_MCC) September 19, 2019