हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Child Care) पावसाळा म्हटलं की, त्यासोबत संसर्गजन्य आजार आपोआपच डोकं वर काढू लागतात. खास करून लहान मुलं संसर्गांमुळे लवकर आजारी पडतात. त्यात शाळा सुरु झाल्यामुळे कितीही पाऊस असला तरी मुलांना घराबाहेर पडावं लागतं. परिणामी, साचलेलं पाणी, पावसात भिजणे यामुळे मुलं आजारी पडतात. पावसाळ्याच्या दिवसात हवामानात आद्रता वाढते. परिणामी जीवजंतूंची अमर्याद वाढ होते.
हे विषाणू हवेतून अनेक आजार पसरवतात. अशा संसर्गजन्य आजारांमुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते आणि इतर आजार देखील आपल्या शरीरावर अगदी सहज हल्ला करू शकतात. म्हणूनच अशा इन्फेक्शनपासून मुलांचे संरक्षण करणे (Child Care) गरजेचे असते. पण कसे? याचेच उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
पावसाळ्याच्या दिवसात डास चावणे, दूषित पाणी पिणे, दूषित अन्न खाणे, अस्वच्छता यामुळे विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. अगदी ताप, सर्दी, खोकला यांसह त्वचा रोग, गॅस्ट्रो, कावीळ असा अनेक समस्या होण्याचा धोका वाढलेला असते. त्यामुळे अशावेळी मुलांची काळजी कशी घ्यावी? असा प्रश्न प्रत्येक पालकांना पडतो. आज आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.
1) ओले कपडे घालू नका (Child Care)
पावसाच्या दिवसात कपडे लवकर सुकत नाहीत. त्यामुळे बरेच लोक घाईच्या वेळेत असेच ओले कपडे परिधान करतात. लहान मुलांच्या शाळेचे ड्रेस सुकले नसतानाही परिधान केल्याने मुलांना त्वचारोग होण्याची शक्यता असते. एकतर पावसाळ्यात हवेमध्ये आद्रता असते. ज्यामुळे कपड्यांमध्ये ओलावा कायम राहतो. शिवाय पावसात भिजल्याने आणखी कपडे ओले होतात. असे ओले कपडे अंगावर अधिक वेळ राहिल्यास मुलांना गजकर्ण, चिखल्या, फंगल इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे ओले कपडे घालू नये आणि अंग ओले झाल्यास त्वरित कोरडे करावे.
2) फ्लूचे लसीकरण करून घ्या
पावसाळ्यात मुलांना फ्लू होण्याची शक्यता सर्वाधिक असते. (Child Care) चुकीचे अन्न वा दूषित पाणी प्यायल्याने मुलांची रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि अशा मुलांच्या शरीरावर इन्फ्लुएंझा जिवाणू हल्ला करतात. यामुळे जो ताप येतो त्याला फ्लू म्हणतात. हा ताप संसर्गजन्य असल्याने एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे जाऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान मुलांसाठी फ्लूचे लसीकरण करून घ्या. असे केल्यास मुलांचे फ्लूपासून रक्षण होईल.
3) पाण्याचे निर्जंतुकीकरण करा
आपण घरात जे पाणी पितो ते स्वच्छ आणि निर्जंतुक असायला हवे. (Child Care) बऱ्याचदा पावसाळ्यात पाणी खराब येते आणि असे पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्या होतात. मुलांना कावीळ, गॅस्ट्रोसारख्या संसर्गांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पावसाळ्यात पाणी गाळून घ्या आणि गरम करून प्या.
4) उघड्यावरील अन्न खाऊ नका
लहान मुलांच्या घरच्या जेवण्यापेक्षा बाहेरचे चमचमीत, तळलेले पदार्थ खाण्याची भारी हौस असते. पण पावसाच्या दिवसात असे बाहेरचे उघड्यावरील अन्नपदार्थ तसेच घरात शिळे अन्नपदार्थ खाल्ल्यास मुलांना टायफॉईड, गॅस्ट्रो, कावीळ (पिवळी कावीळ) चा संसर्ग होऊ शकतो. (Child Care) त्यामुळे आपली मुलं बाहेरचे पदार्थ आणि घरात शिळे अन्न खाणार नाहीत याची काळजी घ्या.
5) अस्वच्छता नको
जिथे अस्वच्छता असते तिथे डासांचा प्रभाव असतो. खा करून पावसाच्या दिवसात घराच्या आसपास किंवा कुंड्यांमध्ये पाणी साचले तर लगेच डास होतात. त्यामुळे एकतर घरात किंवा घराच्या आसपास पाणी साठणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा, डासांच्या प्रभावाने मुलांना डेंग्यू, मलेरियाचा संसर्ग होऊ शकतो.
6) सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा
पावसाळ्याच्या दिवसात मुलांना सार्वजनिक ठिकाणी फिरायला नेताना किंवा बागेत नेतेवेळी मास्क घालावा. (Child Care) ज्यामुळे मुलांच्या शरीरात हवेतील जंतू प्रवेश करण्यास असमर्थ ठरतील आणि मुलांचा संसर्गापासून बचाव होईल.