गुजरातमध्ये ३०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी चीनी कंपनीचा अदानींशी करार 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारत आणि चीन या दोन्ही देशाच्या सीमेवर तणाव आहे. भारतातून चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. अशातच आता चीनी कंपनीने गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अदानींशी करार केला आहे. या दोन्ही समूहातील प्रस्तावित समूहाचा भाग म्हणून ईस्ट होप समूहाकडून ३०० डॉलर पेक्षा जास्त गुंतवणूक अपेक्षित असल्याचे समोर आले आहे. चीनमधील ईस्ट होप या समूहाशी अदानी यांनी करार केला आहे.

ईस्ट होप हा चीनमधील सर्वात मोठ्या समूहापैकी एक समूह आहे. त्यांनी अदानी समुहाशी करार केला असून ते याद्वारे गुजरातमध्ये सौर ऊर्जा निर्मितीची उपकरणे तयार करण्यासाठी काम करत आहेत. यासाठी ते ३०० दशलक्ष डॉलर गुंतवणूक करणार असल्याची माहिती समोर आली आहे. “भारत आणि चीनमधील या दोन आघाडीच्या कंपन्यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य करारामध्ये गुजरातच्या मुंद्रा सेझेडमुंद्रा सेझेडमध्ये सौर उर्जा उत्पादन उपकरणे, रसायने, अ‍ॅल्युमिनियम व पशुखाद्य तयार करण्यासाठी ईस्ट होप ग्रुपचे अभियांत्रिकी व औद्योगिक एकत्रीकरण करण्याचे उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.”असे निवेदनात म्हटले आहे.

या दोन्ही समूहातील प्रस्तावित सहकार्याचा भाग म्हणून ईस्ट होप समूहाकडून अंदाजे 300 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक अपेक्षित आहे. ईस्ट होप ग्रुप ही ७० अब्ज युआन कंपनी चीनमधील सर्वात मोठी कॉर्पोरेट हाऊस म्हणून ओळखली जाते. जे जगातील पहिल्या 10 एल्युमिनियम उत्पादकांपैकी एक आहे. शांघाय येथे या कंपनीचे मुख्यालय असून कंपनीच्या १५० सहाय्यक कंपन्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment