नोकरी आणि बिझनेस करण्याऐवजी निवडा हे पर्याय; कमी कालावधीतच व्हाल लखपती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरी की बिजनेस म्हणलं की अनेकजण नोकरी हा पर्याय निवडतात. कारण नोकरीमध्ये आठ तास काम करणे, महिन्याला पगार घेणे, दिले जाणारेच काम करणे, या सर्व बाबी असतात. याच्या उलट बिजनेस करायचे म्हटले की, आर्थिक पाया भक्कम ठेवूनच सर्व बाबींचे नियोजन करावे लागते. यात बिझनेस चांगला चालला तर ठीक नाही चालला तर आर्थिक फटका ही सहन करावा लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पैसे कमावण्याचे असे काही पर्याय सुचवणार आहोत, जे तुमच्यासाठी ही सोयीचे ठरतील.

कर्ज देऊन व्याजातून पैसा मिळवा – सध्या महागाई वाढल्यामुळे पैशांची गरज सर्वांना असते. त्यामुळे अनेकजण कर्ज घेण्याचा मार्ग निवडतात. आजकाल आपल्याकडे घर घ्यायचे असो, की कार घ्यायची असो, किंवा साधा फोन घ्यायचा असो कर्ज काढलेच जाते. त्यामुळे तुम्ही पैसे कमवण्यासाठी एक रक्कम जमा करून गरजू व्यक्तीला देऊ शकता. या कर्जावर मिळणाऱ्या व्याजदरातून तुम्हाला आर्थिक फायदा होईल. परंतु कोणत्याही व्यक्तीला कर्ज देताना काही कायदेशीर नियम पाळणे ही आवश्यक आहेत, तेही तपासून घ्या.

स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करा – आज काल स्टार्टअप सुरू करणारे व्यक्ती गुंतवणूकदाराच्या शोधात असलेले पाहायला मिळतात. अशावेळी तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या स्टार्टअप मध्ये गुंतवणूक करून सांगा पैसा मिळवू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्या नवीन व्यक्तींनी स्टार्टअप सुरू केले आहे त्याचा शोध घ्यावा लागेल. आणि विश्वास ठेवून त्या व्यक्तीच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करावी लागेल.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा – पैसे कमवण्यासाठी शेअर मार्केट देखील चांगला पर्याय ठरू शकतो. परंतु त्यासाठी तुम्हाला सखोल अभ्यासाची गरज आहे. तसेच पैसे गुंतवण्यासाठी एक चांगली रक्कम तुमच्याजवळ असायला हवी. शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला त्यातून चांगला परतावा मिळू शकतो. तसेच तुम्ही म्युच्युअल फंडाचा देखील विचार करू शकता. ज्यामुळे चांगली रक्कम तुम्हाला मिळेल.