SIP मधून दुप्पट परतावा हवा आहे? तर निवडा ‘हा’ पर्याय; गुंतवणुकीपेक्षा मिळेल अधिक पैसा

SIP Plans
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या बँकांच्या अनेक विविध योजना लोकप्रिय ठरत असल्या तरी लोकांचा सर्वाधिक कल SIP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी वाढला आहे. सध्याच्या काळात SIP कडे गुंतवणूकदार एक चांगला पर्याय म्हणून पहात आहेत. कारण, SIP मध्ये गुंतवणूक केल्यास 12 टक्क्यांनी परतावा दिला जात आहे. यामध्ये तुम्ही जर जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली तर चक्रवाढ व्याजाचा फायदा ही गुंतवणूकदारांना घेता येतो. मात्र यापेक्षा देखील अधिक व्याज तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आवश्य पुढील पर्याय निवडावा.

टॉप अप पर्याय

SIP मधून अधिक परतावा हवा असल्यास टॉप अपचा पर्याय निवडावा. असे केल्यास तुम्हाला मिळणाऱ्या परताव्यात आणखीन वाढ होईल. SPI मध्ये प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करावी लागते. म्हणजेच, SPI मध्ये तुम्ही जर दरमहा 2 हजार रुपयांची गुंतवणूक केली असेल तर तुम्ही कितीही वर्षांची SIP घेतली तरी तुम्हाला 2 हजार रुपये भरावे लागतील. परंतु यात तुम्ही टॉप अपचा पर्याय निवडला तर तुम्ही जी नियमित रक्कम भरत आहात त्यात जास्तीची रक्कम जोडता येते.

थोडक्यात सांगायचे झाले तर, प्रत्येक महिन्याला तुम्ही दोन हजार रुपयांची SIP करत असाल तर टॉप अपअंतर्गत प्रत्येक वर्षाला यामध्ये अतिरिक्त रक्कम जमा करता येते. तुम्ही जर तुमच्या SIP मध्ये 10 टक्क्यांनी वाढ करायची ठरवले तर तुम्हाला दुसऱ्या वर्षी 2 हजार रुपयांऐवजी 2200 रुपये भरावे लागतील. दुसऱ्या वर्षात पुन्हा 10 टक्क्यांनी वाढ करावी लागेल. यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या परताव्यातही अधिक वाढ होईल.

तसेच तुम्ही तुमच्या SIP मध्ये 10 टक्क्यांनी वाढ करून सलग 15 वर्षे ही रक्कम भरते तर तुमची रक्कम 62 हजार 540 रुपये इतकी जमा होईल. यावर व्याज 74 हजार 230 रुपये मिळेल. तर एकूण पंधरा वर्षात तुम्हाला 17 लाख 36 हजार 770 रुपये मिळून जातील. हा फायदा हवा असल्यास एस आय पी करताना तुम्ही टॉप अप पर्याय हा पर्याय निवडावा.