हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन CIBIL Score For Loan। मित्रानो, कोणत्याही बँकेत तुम्ही कर्ज काढायला गेला तर सर्वात आधी तुमचा सिबिल स्कोर चेक केला जातो. तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तरच तुम्हाला बँकेतून कर्ज मिळते, आणि सिबिल स्कोर चांगला नसेल तर कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देत नाही. परंतु यामुळे यांना प्रथमच कोणतं तरी कर्ज काढायचं आहे अशा लोकांना फटका बसतो. मात्र आता त्यावर उपाय म्हणून सरकारने थेट नियमात बदल केला आहे. जे ग्राहक प्रथमच कर्ज काढत आहेत अशा लोकांना आता सिबिल स्कोर नसतानाही कर्ज मिळणार आहे.
मंत्रालयाने या संदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे की पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्यांसाठी CIBIL स्कोअर आवश्यक नाही त्यामुळे अशा लोकांना CIBIL स्कोअरच्या आधारे कर्ज देण्यास बँका नकार देऊ शकत नाहीत. खरं तर संबंधित व्यक्तीवर कर्ज किती आहे किंवा त्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी केली आहे? याबाबतची सगळी माहिती सिबिल स्कोरच्या माध्यमातून मिळते, त्यामुळे कर्ज देण्यापूर्वी बँका तुमचा सिबिल स्कोर (CIBIL Score For Loan) तपासतात. परंतु जे प्रथमच कर्ज घेत आहेत त्यांचा सिबिल स्कोर नसल्यामुळे बँक किंवा एनबीएफसी यांच्याकडून त्यांना कर्ज दिले जात नाही. अशा ग्राहकांना सरकारच्या नवीन नियमामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मंत्री काय म्हणाले? CIBIL Score For Loan
याबाबत राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत म्हटले की, रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) च्या निर्देशांनुसार, बँका किंवा इतर कर्जदाते केवळ कमी किंवा शून्य CIBIL स्कोअरच्या आधारे कोणालाही कर्ज नाकारू शकत नाहीत. 6 जानेवारी 2025 रोजी RBI ने जारी केलेल्या मास्टर डायरेक्शनमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की क्रेडिट इतिहासाअभावी ग्राहकाला कर्ज नाकारता येणार नाही. ग्राहकांकडे जर CIBIL स्कोअरच नसेल तर अशावेळी सदर ग्राहकाची पार्श्वभूमी आणि पेमेंट इतिहास पाहून कर्ज दिले जाऊ शकते. सरकारने कर्ज अर्जासाठी किमान CIBIL स्कोअर निश्चित केलेला नाही. त्यामुळे बँका CIBIL स्कोअर नसतानाही (CIBIL Score For Loan) कर्ज देऊ शकतात असं पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं.




