CIBIL Score : CIBIL स्कोरबाबत RBI ने नियम बदलला; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । CIBIL Score .याला क्रेडिट स्कोअर असेही म्हणतात…. हा एक तीन अंकी आकडा आहे जो 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. एखाद्या व्यक्तीची क्रेडिट योग्यता सिबिल स्कोरमधून समजते. तसेच एखाद्या व्यक्तीची कर्ज घेण्याची आणि परतफेड करण्याची क्षमता किती आहे हे तुमच्या सिबिल स्कोर वरून कळते. जेव्हा आपण कोणत्याही बँकेकडून कर्ज घेण्यासाठी जातो तेव्हा तुमचा सिबिल स्कोर चेक केला जातो… जर सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला लगेच कर्ज मिळते, आणि तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तर मात्र अनेक वेळा बँका किंवा NBFC थेट नकार देतात. आता याच सिबिल स्कोरबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक आणि वित्तीय कंपन्यांसाठी नवे नियम जारी केले आहेत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत घोषणा केली असून त्याचा ग्राहक आणि बँकांवर काय परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया.

RBI च्या नव्या नियमानुसार, आता बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना (NBFCs) दर 15 दिवसांनी ग्राहकांचा सिबिल स्कोअर (CIBIL Score) अपडेट करावा लागेल. त्यांना ग्राहकाची क्रेडिट माहिती कंपन्यांना (CIC) दर दोन आठवड्यांनी पाठवावी लागेल. CIC ती माहिती वेगाने अपडेट करेल. याचा फायदा बँका आणि ग्राहक दोघांनाही होणार आहे. ग्राहकाचा CIBIL स्कोअर दर महिन्याच्या १५ तारखेला आणि शेवटी अपडेट केला जाऊ शकतो. क्रेडिट संस्था (CI) आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (CIC) यांना वाटल्यास ते 15 दिवसांच्या अंतराने डेटा अपडेट करण्यासाठी एक निश्चित तारीख सुद्धा ठरवू शकतात. क्रेडिट संस्थांनी ग्राहकांची क्रेडिट माहिती दर महिन्याला सीआयसी यांच्याकडे सबमिट करणं आवश्यक आहे.

बँका आणि ग्राहकांना फायदा – CIBIL Score

आरबीआयच्या या नव्या नियमला फायदा जसा बँकांना होईल तसाच तो ग्राहकांना सुद्धा होणार आहे. क्रेडिट स्कोअर त्वरीत अपडेट करून, बँका आणि NBFC कोणाला कर्ज द्यायचे आणि कोणाला नाही हे अधिक चांगल्या प्रकारे ठरवू शकतील. जर एखाद्या ग्राहकाने कर्ज चुकवले तर ते 15 दिवसांत बँकांना समजेल. दुसरी गोष्ट म्हणजे ग्राहकांना सुद्धा याचा फायदा होणार आहे कारण त्यांचा क्रेडिट स्कोअर लवकर अपडेट होईल. जर क्रेडिट स्कोर खराब झाला तर तो लगेच समजल्यामुळे सुधारण्यास सुद्धा मदत होईल. ज्यांचा क्रेडिट स्कोअर (CIBIL Score) चांगला आहे त्या ग्राहकांना कमी दरात कर्ज मिळू शकतो.