सिडकोने शिथिल केल्या या 2 अटी; 11 डिसेंबरपर्यंत करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सिडको मार्फत नागरिकांना कमी किमतीमध्ये घर उपलब्ध होत असतात. आता या सिडकोच्या घरासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 11 डिसेंबर 2024 ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आजपर्यंत या सिडको अंतर्गत जवळपास 96 हजार ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहे. याबाबत नियम देखील सिडकोने दिलेले आहेत. आता समाजातील प्रत्येक घटकाला या प्रक्रियेत सहभागी होता यावे आणि अर्ज प्रक्रिया करता यावे. यासाठी बारकोड नसलेले रहिवासी प्रमाणपत्र आणि स्टॅम्प पेपर वर शपथपत्र देण्याची अट शिथिल केलेली आहे. आता उरलेल्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता यावा, यासाठी कोणी हा निर्णय घेतलेला आहे.

सिडको हे शहराच्या अनेक भागांमध्ये 27 ठिकाणी 67 हजार घरे बांधत आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात 43 हजार घरांना महारेराची परवानगी मिळालेली आहे. आणि त्यांचे बांधकाम देखील चालू झालेले आहे. यातील 26000 घरांची योजना ही 11 ऑक्टोबर पासून सुरू केलेली आहे. यामध्ये जवळपास 13000 घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. तर उर्वरित ते 13 हजार घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. यातील सर्वात जास्त म्हणजे जवळपास 50% घरे हे तळोजात आहेत. तसेच खानदेश, मानसरोवर आणि खारकोपर यांची सारख्या ठिकाणी देखील घरांचा समावेश असणार आहे.

सिडको अंतर्गत अर्ज करण्यासाठी सुरुवातीला 11 नोव्हेंबर पर्यंत अर्ज नोंदणीची शेवटची तारीख ठेवली होती. परंतु या दरम्यान विधानसभा निवडणूक होती. त्यामुळे अनेक ग्राहकांना अर्ज करता आला नाही. आणि म्हणूनच अर्ज नोंदणीची प्रक्रिया 11 डिसेंबर पर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे आता नागरिकांना त्यांचे उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र यांसारख्या कागदपत्रांची जमवाजमव करायला वेळ मिळणार आहे. तुम्हाला सिडको अंतर्गत ऑनलाइन अर्ज नोंदणी करताना बारकोड असलेले प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल केली आहे. त्यामुळे बारकोड नसलेले प्रमाणपत्र घेऊन देखील तुम्ही अर्ज करू शकता. परंतु वाटप पत्र देण्यापूर्वी ते सादर करणे गरजेचे आहे. असे देखील सिडकोने सांगितलेले आहे. तसेच शंभर किंवा पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर करण्याची अट देखील शिथील करण्यात आलेली आहे.