Cidco Lottery 2024 : सिडकोच्या 26000 घरांच्या किमती जाहीर! 25 लाखांपासून सुरुवात

cidco
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cidco Lottery 2024 : सध्या मोठमोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती आवाक्याच्या बाहेर गेलेल्या दिसत आहेत. या वाढलेल्या घरांची किमती म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र सर्वसामान्य माणसाच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या संस्था म्हणून सिडको आणि म्हाडा यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. नुकतेच सिडको कडून “माझे पसंतीचे सिडको घर” या योजनेच्या 26000 घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत.

या योजनेसाठी सिडको कडून ऑनलाईन (Cidco Lottery 2024) अर्ज नोंदणी करण्यास सांगण्यात आले होते. यासाठी तब्बल तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही 10 जानेवारी 2025 पर्यंत आहे.

कुठे आहेत घरं? (Cidco Lottery 2024)

सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडको घर” या योजनेअंतर्गत तब्बल 26000 सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता नवी मुंबईतील वाशी, बामनडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली रोड मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

काय आहेत घरांच्या किंमती?

EWS अर्थात आर्थिक दुर्बल घटक गटासाठी 25 ते 48 लाखांपर्यंत घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. तर, अत्यल्प (LIG) गटासाठी घरांच्या किमती 34 लाखांपासून 97 लाखांपर्यंत आहेत.

आर्थिक दुर्बल घटक (EWS ) गटात अर्ज करणाऱ्यांसाठी म्हणजे ज्यांचं वार्षिक आर्थिक उत्पन्न सहा लाखांपर्यत आहे त्या गटासाठी घरांच्या किमती या 25 लाखापासून 48 लाखांपर्यंत ठेवण्यात आल्या आहेत.

अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) आर्थिक वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा जास्त आहे या गटामध्ये घराच्या किमती (Cidco Lottery 2024) या 40 लाखांपासून ते 97 लाखांपर्यंत ठेवण्यात आले आहेत.

गट EWS ( आर्थिक दुर्बल घटक )

तळोजा सेक्टर 28 – 25.1 लाख
तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख
खारघर बस डेपो – 48. 3 लाख
बामणडोंगरी -31. 9 लाख
खारकोपर 2A, 2B -38.6 लाख

अल्प उत्पन्न गट एलआयजी

पनवेल बस टर्मिनस – 45.1 लाख
खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख
तळोजा सेक्टर 37 – 34.2 लाख 46.4 लाख
मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख
खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख खारकोपर ईस्ट – 40.3 लाख
वाशी ट्रक टर्मिनल – 74.1 लाख
खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख
कळंबोली बस डेपो – 41.9 लाख