हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या स्वतःचे हक्काचे घर असावे. असे प्रत्येक सर्वसामान्य माणसाचे स्वप्न असते. आणि त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी सीडीको महानिर्वाण ही योजना सर्वसामान्य नागरिकांना हातभार लावत असतात. आता या योजनेअंतर्गत घरांची नोंदणी करण्यासाठी सीडीकोने त्यांच्या नोंदणी प्रक्रियेत मुदत वाढ केलेली आहे. या सिडको अंतर्गत घर मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. परंतु जर काही कारणांमुळे तुम्ही अजूनही ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले नसेल, तर आता त्या लोकांसाठी ही एक चांगली संधी आहे. कारण सीडीकोने त्यांच्या अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढ केलेली आहे.
सिडीकोच्या माध्यमातून आता शहरातील विविध नोट मधील 27 ठिकाणी जवळपास 60 हजार घरे बांधली जात आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात 43 हजार घरांना महारेरा परवानगी मिळालेली आहे. आणि बांधकाम देखील आता चांगलेच प्रगतीवर आलेले आहे. त्यातील आता 26000 घरांची योजना 11 ऑक्टोबर पासून सुरु झाली आहे आणि त्या ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत 11 नोव्हेंबर पर्यंत होती. परंतु आता अर्ज करण्याची शेवटची तारीख सीडीकोने वाढवलेली आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही अर्ज करू शकता.
ज्या लोकांनी अर्ज केले नाहीत, त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करा. दिवाळी आणि निवडणुकांमुळे अनेक लोकांना अर्ज करता आलेले नाहीत. परंतु आता सीडीकोने अर्ज करण्याची प्रक्रिया 11 डिसेंबर पर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे अजून एक महिना आहे. कालपर्यंत जवळपास 81,900 ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेली आहे. तसेच 22100 ग्राहकांनी अर्ज नोंदणी शुल्क देखील भरलेली आहे. परंतु आता अर्ज भरण्याला अजून एक महिना आहे. त्यामुळे यापेक्षाही खूप जास्त अर्ज प्राप्त होऊ शकतात. अशी आशा सिडीकोने व्यक्त केली आहे.