Cidco lottery : सिडको कडून मुंबईत घेता येणार 2 घरं ? किंमती देखिल कमी होणार

cidco
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cidco lottery : मुंबई सारख्या मोठ्या शहरात स्वात:चे घर असणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. शिवाय दुसरी महत्वाची बाब म्हणजे येथे घरांच्या किमती इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहेत. पण सिडको तुम्हाला मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते. ते देखील परवडणाऱ्या किमतीत. सिडकोच्या नियमानुसार एक घर असताना नवी मुंबई शहरात दुसरे घर विकत घेता येत नाही, पण आता या नियमात बदल करण्याचा विचार सिडकोने (Cidco lottery) केला असून याबाबतचे संकेत सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिले आहेत.

याबाबत माहिती देताना शिरसाट यांनी सांगितले की, नवी मुंबईत सिडकोने काढलेल्या ‘माझे पसंतीचे घर’ या योजनेत देण्यात आलेल्या घरांच्या किमती जास्त असल्याने त्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असून मुख्यमंत्रीसोबत (Cidco lottery) याबाबत बोलणार असून सिडकोची दोन घरे घेता यावीत यासाठी सिडकोच्या बोर्ड मिटींगमध्ये प्रस्ताव ठेवणार असल्याचे सिडको अध्यक्ष आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितले आहे.

सिडकोचे घर घेण्यासाठी अनेक अटी व शर्ती लागू आहेत. पती किंवा पत्नीच्या नावे नवी मुंबई शहरात घर असेल तर सिडकोचे घर घेता येत नाही. ही अट कधी कधी सर्वसामान्यांसाठी जाचक वाटते. सिडकोच्या नियमानुसार दुसरे घर घेता येत नसल्याने अनेकांना गैरसोय होते. ही बाब लक्षात (Cidco lottery) घेऊन ही अट शिथिल करण्याचा निर्णय सिडको घेऊ शकते. त्यामुळं आधीच नावावर एक घर असेल तरी आता सिडकोचे दुसरे घर घेता येणार आहे.