CIDCO Lottery : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सिडकोच्या घरांची सोडत ? 15 घरांचे पर्याय देण्यात येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

CIDCO Lottery : मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये घर घ्यायचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या संस्था म्हणजे म्हाडा आणि सिडको… म्हाडासाठी 2030 घरांची सोडत आधीच जाहीर झाली आहे. मात्र सिडकोच्या लॉटरीची प्रतीक्षा ग्राहकांना लागून राहिली आहे. यापूर्वी 7 तारखेला सिडकोची लॉटरी जाहीर होणार असे सूतोवाच सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांच्याकडून मिळाले होते. मात्र 7 तारखेला तर लॉटरी निघाली नाही. त्यामुळे वारंवार तारीख पुढे जात असल्यामुळे घर खरेदीदारांना प्रतीक्षा (CIDCO Lottery) लागून राहिली आहे.

असे असताना आता सोडत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला काढण्यासाठी सिडको सज्ज झाल्याची माहिती आहे. त्याकरिता सिडकोकडून घर खरेदीदाराकडून सर्वप्रथम नोंदणी अर्ज मागविले जाणार आहेत. यामध्ये एकूण 67 हजार घरांपैकी 26 हजार घरांची सोडत (CIDCO Lottery) निघणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 11 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वाशी येथे महाराष्ट्र भवनच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याने त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिडको घरांची सोडत काढण्याचा सिडकोचा निश्चय आहे. त्यादृष्टीने सिडकोचा मार्केटिंग विभाग व व्यवस्थापन विभाग घरांची सोडत काढण्यासाठी कार्यरत झाला असल्याची माहिती (CIDCO Lottery) आहे.

15 घरांचे पर्याय देण्यात येणार (CIDCO Lottery)

या सोडतीत ग्राहकाला आपल्या पसंतीचे घर निवडण्यासाठी 15 घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्या पसंतीक्रमाला एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त होतील; त्या घरासाठी सोडत निघून विजेत्याला ते घर उपलब्ध होईल. त्यामुळे या घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत, पैसे भरण्याची मुदत, पसंतीच्या घरासाठी पर्याय निवडण्याची व सोडतीची मुदत आदींचे वेळापत्रक सिडको जाहिरातीत नमूद करणार आहे.

कोणत्या भागात मिळणार घरे ? (CIDCO Lottery)

या लॉटरी मध्ये 13 हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, तर उर्वरित 13 हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. यातील सर्वाधिक जवळपास 50 टक्के घरे एकट्या तळोजा नोडमधील आहेत. खांडेश्वर, मानसरोवर, खारकोपर आणि बामणडोंगरी गृहप्रकल्पांतील शिल्लक घरांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. ही सर्व घरे बाजारभावाच्या तुलनेत कमी असणार आहेत. तसेच जुईनगर, वाशी, खारघर या प्रकल्पांतील घरांचा या योजनेत समावेश करण्यात आला नाही.