मुंबई आणि उपनगरांमध्ये स्वप्नातील घर घेणं हे सामान्य माणसासाठी दिवास्वप्न वाटतंय. मात्र, आता हे स्वप्न पूर्ण होणार आहे तेही परवडणाऱ्या दरात कारण CIDCO ने घेतला आहे एक मोठा निर्णय. दोन वर्षांत तब्बल 3,251 कोटी रुपयांची गुंतवणूक करत नव्या गृहप्रकल्पांची उभारणी होणार आहे. आणि हो… लवकरच आणखी 25 हजार घरे बाजारात येणार आहेत.
दोन वर्षांत 3,251 कोटींचे घरप्रकल्प
सिडकोने नुकताच 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला असून त्यामध्ये नवी मुंबईतल्या गृहनिर्माण प्रकल्पांवर 3,251 कोटी रुपये खर्च होणार आहेत. यामध्ये घरांच्या जोडीला मेट्रो, एज्युसिटी, पाणीपुरवठा आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पालाही मोठी तरतूद आहे.
50,000 हून अधिक घरांची तयारी
सिडकोने अलीकडेच 26,000 घरांची लॉटरी काढली असून अजून 25,000 घरे बांधण्याचं काम सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक लाख घरं तयार करण्याचं मोठं टार्गेट CIDCO ने घेतलं आहे.
12,000 घरे विक्रीविना पडून
सध्या पती-पत्नीपैकी एकाच्या नावे नवी मुंबईत घर असल्यास दुसरं घर घेता येत नाही – हा नियम घातक ठरत आहे. सिडको या अटीत शिथिलता आणण्याचा विचार करत आहे. यामुळे 12,000 घरे विकण्याचा मार्ग मोकळा होईल.
हस्तांतरण शुल्कात 5-10% वाढ
सिडकोने मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ जाहीर केली आहे.
- 20 चौरस मीटरपर्यंत घरांसाठी: ₹27,000 – ₹77,000
- 200 चौरस मीटरपेक्षा मोठ्या मालमत्तांसाठी: ₹1.11 लाख – ₹2.31 लाख
ही दरवाढ मालमत्तेच्या आकारमान आणि स्थानानुसार बदलणार आहे.
नवी मुंबईत घर घेणं स्वप्नवत राहणार नाही, ते प्रत्यक्षात उतरणार आहे. CIDCO ने जो गृहविकासाचा रोहाणा आखलाय, तो आगामी वर्षांत सामान्यांसाठी मोठा गेमचेंजर ठरेल. नव्या लॉटऱ्या, गुंतवणूक, नियम सुलभता आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष – ही सर्व सूत्रं एकत्र येऊन ‘Affordable Housing’ ला खऱ्या अर्थाने नवा आयाम देणार आहेत.