विमानतळावर हार्ट अटॅक आलेल्या प्रवाशाला CISF जवानाने दिले जीवनदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चेन्नई : वृत्तसंस्था – आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ झटकन वायरल होत असतात. अशा वायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पोलिसांचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. काही व्हिडिओंमध्ये पोलिसांच्या (police) कृत्याने त्यांचे कौतुक केले जाते तर काही व्हिडिओमध्ये त्यांच्या कृत्याने त्यांना नेटकऱ्यांचे अपशब्द ही ऐकावे लागते. पण सध्या तमिळनाडूच्या विमानतळावरील हा व्हिडिओ जो वायरल होत आहे. या व्हिडिओ मधल्या एका CISF जवानाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

CISF जवानाने प्रसंगावधान साधत केलेल्या या कृत्यामुळे सर्वत्र त्यांच्यावर कौतुकांचे वर्षाव होत आहे. हा व्हिडिओ तमिळनाडूच्या चेन्नई विमानतळावरील असल्याचे समोर आले आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो एक व्यक्ती स्ट्रेचर वर आहे आणि त्या व्यक्तीच्या छातीवर हात ठेवून CISF जवान वेगाने दाब देत आहे.

काय घडले नेमके?

तमिळनाडूच्या चेन्नई विमानतळावर एका व्यक्तीला अचानक हार्ट अटॅक आल्याने तेथील उपस्थित असलेल्या एका CISF जवानाने त्याला सीपीआर दिला. आणि त्यांच्या या सीपीआर देण्याने या व्यक्तीचा जीव वाचला. हार्ट अटॅक आल्यानंतर सीपीआर दिला जाणारा तात्काळ असा उपचार आहे. या घटनेनंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची तपासणी केल्यानंतर डॉक्टरने सांगितले की, या व्यक्तीला वेळेत सीपीआर दिल्याने त्याचा जीव वाचला. सीआयएसएफ जवानाच्या या कृत्यामुळे त्याला कोणी सुपर हिरो तर कोणी स्पायडरमॅन म्हणून संबोधित करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.