निजामाचा वंशज असल्याचा दावा करत कृषी विद्यापीठाची कोट्यावधीची जमीन विकली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : निजामाचा वंशज असल्याचे सांगत कृषी विद्यापीठातील कोट्यवधी रुपयांची जमीन पंचवीस लाखात विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अली खान उर्फ दिलशाद जहां असे जमीन विकणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. निजामाचा वंशज असल्याचा दावा करणाऱ्या याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलशाद उर्फ अली याने हिमायतबाग येथे चारशे एकरवर दावा ठोकला आहे. बटाटे व कांद्याच्या शिक यांच्या आधारावर हा दावा त्याने केला आहे.

भडकलगेट येथील शिक्षक मोहम्मद नदीम सलीम पाशा (वय 46) यांची हैदराबाद येथील नातेवाईकांच्या माध्यमातून दिलशाद आली खान ऊर्फ दिलशाद शहां सोबत ओळख झाली होती ओळखी त्याने आपण निजाम वंशज असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दिलशादने हिमायतबाग येथे चारशे एकर जमीन आमच्या नावे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने व्हाट्सअपवर सर्व नदीम पाशा यांना कागदपत्रे पाठवले आणि 25 लाखात जमीन देण्याचे सांगितले. मोहम्मद पाशा यांनी होकार दिला आणि पैसेही दिले. काही दिवसांनी रजिस्ट्री करण्यासाठी आग्रह धरला असता दिलशाद जहां याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. नदीम पाशा यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी 25 लाखाची रक्कम परत करण्यास तगादा लावला असता कॉन्ट्रॅक्ट किलर मार्फत जीवे मारण्याची धमकी दिलशाद याने दिली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून दिलशाद जहां विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

अतिक्रमण हटवताना हत्याराचासाठा आढळला :

फळ संशोधन केंद्र परभणीच्या शासकीय जागेवर ताबा झाल्याचे कळताच मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष घालत तेथील अतिक्रमण हटविले. अतिक्रमण हटवताना शेडमध्ये काही तलवारी पुरून ठेवल्याचे उघडकीस आले होते. यामुळे निजाम वंशज दिलशाद जहा याचे पितळ उघडे पडले.

Leave a Comment