कराड | वहागाव (ता. कराड) येथे दोन गटात तुंबळ मारामारी झाली. दोन्ही गटाने एकमेकांना लाकडी दांडके, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामध्ये चौघे जखमी झाले. याप्रकरणी तळबीड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून सुमारे तीस जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विजय दिनकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संजय निवृत्ती पवार, राजेंद्र निवृत्ती पवार, आकाश राजेंद्र पवार, रोहित दादासाहेब पवार, आदीत्य राजेंद्र पवार, अर्जुन दादासाहेब पवार, विश्वजीत कृष्णात पवार, विवेक कृष्णात पवार, इंद्रजीत बाळासाहेब पवार यांच्यासह इतर सुमारे पंधरा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गावात वर्तमानपत्र टाकायची नाहीत. गावातल्या बातम्या पेपरला द्यायच्या नाहीत. आणि पेपर गावात टाकायचे असतील तर महिन्याला आम्हाला पाच हजार रुपये दे, असे म्हणून आरोपींनी मारहाण केल्याचे विजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत राजेंद्र पवार, विजय पवार, दीपक पवार, धनाजी पवार हे जखमी झाले आहेत.
याउलट आकाश राजेंद्र पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राजेंद्र दिनकर पवार, विजय पवार, धनाजी पवार, तानाजी पवार, दिपक पवार, सचिन पवार यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रिक्षा गेटवर झालेल्या वादाच्या रागातून आरोपींनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबतची नोंद तळबीड पोलिसात झाली आहे.