Cleaning Hacks : पाण्याची टाकी साफ करायची वाटते कटकट ? ट्राय करा ‘या’ काही सोप्या पद्धती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cleaning Hacks : विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात पाणी गढूळ येत असल्यामुळे टाकी घाण होते. पाण्याची टाकी धुण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. जर हे पाणी तसेच राहू दिले तर या दूषित पाण्यामुळे लहानमुलांसह सर्वांना या दूषित पाण्यामुळे त्रास होऊ शकतो. म्हणूनच आज आम्ही अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे सहजसजी तुमही पाण्याच्या टाक्या साफ (Cleaning Hacks) करू शकाल. चला तर मग जाणून घेऊया…

तुरटी (Cleaning Hacks)

तुरटी ही नैसर्गिक क्लिनिंग एजंट म्हणून काम करते. पावसाळ्यात दूषित पाणी येत असल्यामुळे पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. तुरटीचा वापर मोठ्या टॅंक साफ करण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. यासाठी टाकी साफ करताना त्यामधले पाणी अर्ध्यापर्यंत येईल एवढे खाली करा. त्यानंतर बादलीमध्ये पाणी घेऊन त्यात तुरटी घाला. थोड्या वेळाने हे पाणी टाकीच्या पाण्यात घाला आणि हे पाणी टाकीच्या पाण्यात घातल्यानंतर त्यामधली सगळी घाण किंवा गाळ जो असेल तो खाली जमा होतो नंतर एका स्वच्छ कापडाने टाकीत (Cleaning Hacks) जमा झालेले घाण स्वच्छ करा.

हायड्रोजन पेरॉक्साइड

हायड्रोजन पेरॉक्साइड हे एक प्रकारचं केमिकल आहे. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. यासाठी तुम्हाला सावधगिरी सुद्धा तितकीच बाळगावी लागेल. एका मोठ्या पाण्याच्या टाकीला क्लीन करण्यासाठी 500 ml हायड्रोजन परॉक्साईड घ्यावे लागते. पाण्याच्या अंदाजानुसार ते प्रमाण घ्या आणि टाकीच्या पाण्यात मिसळ 15 ते 20 मिनिटं तसंच सोडा. घराच्या सर्वांना सुरू करा. टाकी पूर्णपणे खाली करा आणि हे पाणी बाहेर पडल्यानंतर टाकी स्वच्छ होईल. टाकीचे पाणी बाहेर काढल्यानंतर टाकी पुसून सुकवून (Cleaning Hacks) घ्या आणि नंतर दुसरं पाणी भरा.

वॉटर टॅंक क्लीनर (Cleaning Hacks)

वॉटर टँक क्लीनर हे बाजारामध्ये ऑलरेडी उपलब्ध असतात. हे एक प्रकारचे ब्लिच क्लीनर असतात. हे टॅंक क्लीनरच्या स्वरूपात ओळखले जातात. याच्या वापरासाठी 400 g पावडर ब्लिच किंवा 300 ग्रॅम लिक्विड ब्लिच घ्या आणि आता ही क्वांटिटी दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करा. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण पाण्याच्या टाकीत घालायचे आहे. या पद्धतीने पाण्याची टाकी स्वच्छ (Cleaning Hacks) करता येईल.