Cleaning Hacks : टॉयलेट स्वच्छ करणे मोठ्या मेहनतीचे काम. पण जर टॉयलेट स्वच्छ केले नाही तर अनेक आजरांना निमंत्रण… कारण अनेक बॅक्ट्रिया आणि व्हायरस टॉयलेट मधूनच पसरतात. म्हणूनच टॉयलेट स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. पण अनेकांना हाताने टॉयलेट साफ करणे म्हणजे किळसवाने वाटते. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हला टॉयलेटला हात लावावा (Cleaning Hacks) लागणार नाही आणि टॉयलेटही स्वच्छ होईल. चला तर म्हणून जाणून घेऊया…
सोडा
सोडा हा क्लिनिंग एजंट म्हणून ओळखला जातो. स्वच्छतेच्या अनेक उपायांमध्ये सोड्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. सोडाच्या मदतीने टॉयलेट सीट स्वच्छ करणं खूप सोपं आहे. याकरिता चार चमचे सोडा अर्धा कप पाण्यामध्ये मिक्स (Cleaning Hacks) करून घ्या. त्यानंतर याची चांगली पेस्ट करून घ्या. ही पेस्ट डाग असलेल्या ठिकाणी लावून आर्धा तास तसेच ठेवा. त्यानंतर ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा त्यामुळे सर्व डाग निघून जातील.
ग्लिसरीन आणि व्हिनेगर
व्हीनेगर खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाते. मात्र व्हिनेगर चा उपयोग हा स्वच्छतेसाठी सुद्धा चांगला होऊ शकतो. तसेच ग्लिसरीन आपण त्वचा चांगली बनवण्यासाठी आपण वापरतो मात्र ग्लिसरीनचा वापर क्लीनिंग एजंट म्हणून सुद्धा होऊ शकतो. ही ट्रिक वापरण्यासाठी तुम्ही एका बॉटलमध्ये कोल्ड्रिंक घ्या त्यात एक कप ग्लिसरीन आणि व्हाईट व्हिनेगर मिक्स करा. यात थोडा लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल घालून हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. हे मिश्रण कोणत्याही स्प्रे बॉटलमध्ये भरून टॉयलेट क्लीनर म्हणून तुम्ही वापरू शकता. ज्यामुळे टॉयलेट सीट क्लीन (Cleaning Hacks) तर होईलच शिवाय ती बॅक्टेरिया फ्री सुद्धा होईल.
क्लिनिंग टॅबलेट (Cleaning Hacks)
टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी क्लिनिंग टॅबलेट हा एक उत्तम उपाय आहे बॅक्टेरिया, व्हायरस आणि अन्य किटाणू दूर करण्यासाठी टॅबलेटच्या पाकिटावर लिहिलेले टॉयलेट टॅंक मध्ये घालून ठेवा. यासाठी ब्रशचा वापर करण्याची गरज नाही.
बोरेक्स आणि लिंबाचा रस (Cleaning Hacks)
बोरेक्स पावडर आणि लिंबाचा रस घालून टॉयलेट स्वच्छ करू शकता. ही ट्रिक वापरण्यासाठी तीन ते चार चमचे बोरेक्स पावडर घ्या. त्यामध्ये अर्धा कप लिंबाचा रस मिसळा आणि हे मिश्रण एकजीव करा. हे मिश्रण टॉयलेट सीटवर घालून एक तासासाठी (Cleaning Hacks) तसेच ठेवा त्यानंतर कपड्याने साफ करा. या उपायामुळे टॉयलेट सीट चमकदार होईल