Cleaning Hacks : पावसाळयात हमखास येते भिंतींवर बुरशी ; वापरून पहा सोप्या टिप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cleaning Hacks : आपल्यापैकी अनेकांना पावसाळा हा ऋतू हवाहवासा वाटत असेल पावसाळ्यातलं आल्हाददायक वातावरण , सर्वत्र हिरवळ , गरमागरम भजी चहा, कणीस खाण्याचा आनंद कुणाला नाही आवडत… पण पावसाळ्यासोबत अनेक आजार येतात आणि दमट हवामानामुळे भिंतींवर बुरशी, शेवाळ अशा काही नकोशा गोष्टी सुद्धा पावसाळ्यात येत असतात. भिंतींच्या ओलाव्यामुळे पावसाळयात भिंतींवर येणारी बुरशी ही आरोग्यासाठी घातक तर असतेच शिवाय त्यामुळे भिंती देखील वाईट दिसायला लागतात. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही तुम्हाला काही घरगुती (Cleaning Hacks) टिप्स सांगणार आहोत जेणेकरून घरातील वातावरणही फ्रेश राहील आणि भिंतींवरील बुरशी सुद्धा निघून जाईल.

घरामध्ये भिंतींवर बुरशी अली असेल तर त्याच्या जवळ वस्तू ठेवणे किंवा जाणे टाळा कारण अनेकांना (Cleaning Hacks) बुरशीची ऍलर्जी सुद्धा असू शकते. त्यामुळे शिंका येणे किंवा लहान मुलांच्या तवचेवर रॅश येणे असे प्रकारही घडू शकतात.

एक गोष्ट लक्षात ठेवा बुरशी म्हणजेच फंगस खरंतर पावसाळ्यामध्ये ओलावा निर्माण झाल्यामुळे होत असतात. कारण पावसाळ्यात पुरेसा सूर्यप्रकाश नसतो. हवेतील आद्रतेमुळे घरातील वस्तू, भिंती ह्या ओलसर होतात अशा स्थितीमध्ये हवा खेळती राहणं गरजेचं असतं. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर खिडक्या उघड्या ठेवा सूर्यप्रकाशामुळे फंगस आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. शिवाय या दिवसांमध्ये (Cleaning Hacks) भिंतीला चिटकून कोणतीही वस्तू ठेवू नका कारण बुरशी प्रथम भिंतीवर तयार होते.

एक्झॉस्ट फॅन (Cleaning Hacks)

घरातील किचन, बाथरूममध्ये बऱ्याच अंशी हवा खेळती राहण्यासाठी एक्झॉस्ट फॅन बसवलेले आढळतात. त्यामुळे घरामध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते. घरातील एसी किंवा बेसिनच्या पाईपला गळती होत असेल तर तातडीने या गोष्टी दुरुस्त करून घ्या. खराब होऊ नये म्हणून मसाले आणि धान्य वेळीच सूर्यप्रकाशात ठेवा त्यामुळे घरात कुबट वास पसरणार नाही

विनेगर

व्हिनेगर हे एक प्रकारचे आम्ल आहे. घरामध्ये बुरशीची वाढ होत असेल तर त्या ठिकाणी व्हिनेगर फवारा यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये विनेगर भरा, स्प्रे करा स्प्रे केल्यानंतर स्क्रब करा. वीस मिनिटं तसंच राहू द्या त्यानंतर ओल्या कपड्याने (Cleaning Hacks) पुसून घ्या. त्यामुळे भिंतीवरची बुरशी निघून जाईल.

बेकिंग सोडा (Cleaning Hacks)

जर तुमच्या घरामध्ये विनेगर नसेल तर बेकिंग सोडा हा असतोच. आपण बेकिंग सोड्याचा वापर करून भिंतीवरची बुरशी घालवू शकतो. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये बेकिंग सोडा आणि पाणी घालून मिश्रण तयार करा. तयार स्प्रे भिंतीवर शिंपडा. स्क्रबरने भिंत घासून घ्या. ओल्या कापडाने भिंत पुसून घ्या. यामुळे भिंतीवरचे डागही निघून जायला मदत होईल.