Cleaning Hacks : पांढऱ्या शुभ्र कपड्यांचे इम्प्रेशन काही औरच असते. पण कुठेही वावरताना हे पांढरे कपडे घाण होऊ नयेत किंवा त्याला कोणताही डाग लागू नये म्हणून खूप जपावं लागत. मग एखाद्या कार्यक्रमात आपलं लक्ष हे कार्यक्रमापेक्षा आपला पांढरा शुभ्र ड्रेस खराब तर होणार नाही याकडे असतो. पण आपण कितीही आपल्या ड्रेस ला जपलं तरी नकळत डाग लागतोच. मग हे हट्टी डाग जाताजात नाहीत त्यातही रंगांचे डाग खूपच चिवट असतात. मग आपण तो पांढरा शुभ्र ड्रेस (Cleaning Hacks) घालायचाच बंद करतो.
याशिवाय शाळेच्या मुलांचे कपडे सुद्धा पांढरे असतात. त्याची चमक आणि रंग जसाच्या तसा ठेवण्या शिवाय त्यावरचे हट्टी डाग काढणे मुश्किल असते. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात एक भारी फंडा सांगणार आहोत ज्यामुळे पांढऱ्या कपड्यांवरील (Cleaning Hacks) डाग निघून जातील . हा उपाय एका इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
हा उपाय करण्यासाठी इनो आणि लिंबू हे दोन पदार्थ लागणार आहेत. सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये एकदम कडक पाणी घ्या जर तुमच्या कपड्यांना पडलेला डाग हा खूप जास्त गडद आणि मोठा असेल तर कडक पाण्यामध्ये इनोची चार पाकीट टाका. तुमच्या कपड्याच्या डागानुसार तुम्ही ईनोचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्याच गरम पाण्यामध्ये दोन लिंबांचा रस तुम्हाला टाकायचा आहे. आता हे सगळे मिश्रण (Cleaning Hacks) व्यवस्थित हलवून घ्या आणि त्या मिश्रणात तुमचा डाग पडलेला कपडा तीन ते चार तासांसाठी तुम्हाला भिजत ठेवायचा आहे.
तीन-चार तास हा कपडा भिजल्यानंतर कापड पुन्हा एकदा चांगल्या पाण्यात टाका आणि डाग जिथे पडले होते ती जागा हाताने रगडून स्वच्छ करा. जर तुमच्या कपड्यांना ब्रशने घासलेले चालणार असेल तर ब्रश वापरा या नंतर पुन्हा एकदा कपडा (Cleaning Hacks) पाणी बदलून स्वच्छ धुऊन घ्या. रंगांचे डाग हे गायब झालेले दिसतील.