Cleaning Hacks : उन्हाळ्यात दिवसभर घाम येत असल्यामुळे कपड्यांना घामाचे विशिष्ट डाग पडतात. एवढेच नाही तर कपड्यांना दुर्गंधी सुद्धा येते. अनेकदा महागाडे डिटर्जंट वापरून देखील ही दुर्गंधी आणि डाग कमी होत नाही. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे न धुता देखील घामाचे हे हट्टी डाग आणि दुर्गंधी तुम्ही घालवू शकता. घराच्या घरी उपलब्ध (Cleaning Hacks) असलेल्या वस्तूंचा वापर करून तुम्ही हे डाग घालवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत नक्की या ट्रिक्स ?
बेकिंग सोडा
खरंतर बेकिंग सोडा खाद्यपदार्थांमध्ये वापरला जातो पण अनेक क्लिनींग हॅकस मध्ये देखील बेकिंग सोडा वापरला जातो. कपड्यावरील घामाचे डाग घालवण्यासाठी कपड्याच्या ज्या भागावर डाग पडले आहेत त्या भागावर थोडासा बेकिंग सोडा टाका नंतर ते तसेच ३० मिनिटे राहू द्या. त्यानंतर ब्रशने हलक्या हाताने घासून (Cleaning Hacks) स्वच्छ करा.
व्हीनेगर
स्वयंपाकात वापरण्यात येणारे व्हिनेगर एका प्रकारचे आम्ल आहे. त्यामुळे अनेक क्लिनींग टेक्निक मध्ये त्याचा वापर केला जातो. कपड्यांची घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी व्हिनेगर उपयुक्त ठरेल. यासाठी पाणी आणि व्हिनेगर एका स्प्रे बॉटल मध्ये समप्रमाणात घेऊन ते डागांवर स्प्रे करा. त्यानंतर ते तसेच १० मिनिट राहू द्या. नंतर कोरड्या कापडाने (Cleaning Hacks) पुसून टाका.
कॉर्न स्टार्च
केवळ घामाचे नाही तर कोणत्याही प्रकारचे डाग कपड्यावर पडले असतील तर ते घालवण्यासाठी कॉर्न स्टार्च हा चांगला पर्याय ठरू शकतो. कारण कॉर्न स्टार्च तेल शोषून घेते. त्यामुळे कपड्याच्या डागांवर कॉर्नस्टार्चचा थर लावून ठेवायचा ते रात्रभर तसेच बाजूला राहू द्या आणि सकाळी ब्रशने ते कॉर्नस्टार्च (Cleaning Hacks) काढून टाका.
लिंबाचा रस (Cleaning Hacks)
लिंबाचा रस सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे क्लिनींग साठी सुद्धा त्याचा चांगला वापर होऊ शकतो. लिंबू नैसर्गिक ब्लिचिंग एजंटचे काम करतो. कपड्यावर घामाचे डाग पडले असतील तर ते घालवण्यासाठी लिंबचा रस डागांवर लावा. १५ मिनिटे ठेवा. नंतर थंड पाण्याने धुवून टाका. मात्र गडद रंगाच्या कपड्यांवर याचा वापर करू नका कारण त्यामुळे रंग जाण्याची (Cleaning Hacks) शक्यता असते.