Cleaning Hacks : घराची सफाई ही नेहमीच आवश्यक असते. गृहिणी आपले घर स्वच्छ आणि टापटीप ठेवण्याला प्राधान्य देतात. त्यातही सण -उत्सवांच्या काळात हमखास साफ सफाई केलीच जाते. अनेकदा आपण खिडक्या, किचनमधील ट्रॉलीज, बाथरूम, सिंक सर्वांची सफाई करतो. मात्र अनेकदा सिलींग फॅनची स्वच्छता मागे राहते. टेबलावर चढून फॅन चकाचक करणे (Cleaning Hacks) म्हणजे तसे जिकिरीचे काम. म्हणूनच आज आम्ही घरच्या घरी फॅन क्लीनर कसे बनवायचे पाहुयात …
शाम्पु (Cleaning Hacks)
तुमचे काळेकुट्ट झालेले सिलींग फॅन केवळ एका रुप्याच्या शाम्पूने होईल साफ होतील. फॅन स्वच्छ करण्याचे हे क्लीनर बनवण्यासाठी एका भांड्यात शाम्पू घ्या. अर्धा चमचा मोहरीचे तेल आणि अर्धा ग्लास पाणी घालून (Cleaning Hacks) मिक्स करा. त्यानंतर पंखा स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ स्पंज आणि सुती कापडाचा वापर करा. आता आपण तयार केलेल्या क्लीनरमध्ये स्पंज बुडवा आणि एकेक करून फॅनच्या सर्व ब्लेड वर लावा. दोन-तीन मिनिटे तसंच राहू द्या. सुती कापड थोडेसे ओले करून पुसून टाका. या उपायामुळे तुमचे पंखे चकचकीत होतील.
व्हाईट व्हिनेगर आणि डिश वॉश (Cleaning Hacks)
घरातले पंखे चांगल्या पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तुम्ही आणखी एका पद्धतीनं घरच्या घरी क्लीनर तयार करू शकता. यासाठी तुम्ही व्हाईट विनेगर एका बाऊलमध्ये घ्या. त्यामध्ये डिश वॉश घाला आणि अर्धा ग्लास पाणी (Cleaning Hacks) घालून हे मिश्रण एकत्र करा.आता हे मिश्रण स्पन्जने फॅनच्या ब्लेड वर लावा आणि हलक्या हाताने घासून घ्या. त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्या.