हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cleaning Tips For Home) आपलं घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका असणे ही आपली जबाबदारी असते. त्यामुळे रोजच्या धावपळीतही आपलं घर व्यवस्थित ठेवण्यासाठी महिला सतत धडपड करत असतात. असे असूनही रोजच्या कामाच्या व्यापात घराला द्यायला हवा तितका वेळ काही देता येत नाही. मग कधीतरी घरात इकडे तिकडे पसारा दिसतो. कधी फर्निचरवर लागलेली धूळ दिसते. तर कधी अस्थव्यस्थ झालेलं घर पाहून कुठून आवरायला सुरुवात करू असं होतं.
आजकाल घरातील स्त्री आणि पुरुष दोघेही वर्किंग असतात. त्यामुळे साहजिक आहे घराकडे वेळ द्यायला दोघांनाही नीट जमत नाही. अशावेळी दोन दिवस जरी घर स्वच्छ करता आलं नाही तरी घरात ठिकठिकाणी धूळ जमा होते. ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Cleaning Tips For Home) मग अशावेळी नियमित घर स्वच्छ कसं ठेवता येईल? यावर तोडगा कसा काढता येईल? असा सामान्य प्रश्न समोर येऊन उभा राहतो. तर याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. काही सोप्प्या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचं घर अगदी रोजच्या रोज स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवू शकाल. चला जाणून घेऊया.
कुटुंबातील इतर व्यक्तींची मदत घ्या
तुमचे घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे ही केवळ तुमची नव्हे तर कुटुंबातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. (Cleaning Tips For Home) त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने तुम्ही रोजच्या रोज घर स्वच्छ ठेऊ शकाल. यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या वयोमानानुसार एकेक काम सोपवा. म्हणजे घर नीट ठेवणं तुमच्यासाठीही सोप्प जाईल.
निवड महत्वाची (Cleaning Tips For Home)
तुम्ही तुमचं घर स्वच्छ आणि सुव्यवस्थित दिसण्यासाठी ज्या काही सजावटीच्या वस्तू किंवा फर्निचर घ्याल त्याची निवड योग्य करा. जेणेकरून घरात एकतर पसारा वाटणार नाही आणि दुसरं म्हणजे ते स्वच्छ करणं सोप्प असेल.
घेतलेली वस्तू लगेच जागेवर ठेवा
बऱ्याच लोकांनी एखादी वस्तू जागेवरून उचलली की, भलतीकडेच नेऊन ठेवायची सवय असते. याशिवाय अंघोळीचा टॉवेल, कपडे इकडे तिकडे फेकणे अशा सवयींमुळेसुद्धा घरात पसारा होतो. (Cleaning Tips For Home) जो नंतर आवरू म्हणून असाच राहतो. त्यापेक्षा वेळीच एखादी वस्तू उचलली असता जागेवर ठेवा. म्हणजे पसारा होणार नाही आणि नंतर आवरायला ढीग वाढणार नाही.
वस्तू ठेवण्यासाठी योग्य जागा
तुमच्या वस्तू ठेवण्यासाठी योग्य जागा असेल तर शक्यतो वस्तू इकडे तिकडे टाकल्या जात नाहीत. (Cleaning Tips For Home) जसे की, बास्केट, डब्बे आणि शेल्फसारखी सुविधा असेल तर घरातील इकडे तिकडे दिसणाऱ्या वस्तू त्यांच्या जागेवर ठेवता येतील.
नको असलेल्या वस्तू लगेच फेकून द्या
घरातला पसारा कमी करायचा असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला नको असलेल्या आणि उपयोगी न पडणाऱ्या वस्तू फेकून द्या. विशेषतः घराच्या कोपऱ्यांमध्ये आणि बाथरूममध्ये कमीत कमी सामान ठेवा. (Cleaning Tips For Home) ज्यामुळे अडगळ होणार नाही आणि साफसफाई करताना नाकी नऊ येणार नाहीत.