Cleaning Tips : पावसाळ्याचे दिवस आले म्हटलं की घरामध्ये माशा,डास आणि इतर कीटक घोंगावतात तुम्ही घर कितीही स्वच्छ ठेवला तरी पावसाळ्याच्या दिवसात माशा घरामध्ये अनेकदा घोंगावताना दिसतातच . शिवाय डास आणि माशा यामुळे अनेक भयंकर रोग उद्भवतात त्यामुळे वेळीच तुमच्या घरातून डास आणि माशांना पळवून लावा. तुमच्या घरामध्ये तुमच्या फरशीवर हे कीटक येत असतील तर तुम्ही त्यांना पळवून लावू शकता. यासाठीच आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया…
किडे येऊच नयेत म्हणून…
- बाथरूम आणि टॉयलेट मध्ये एक्झॉस्ट फॅन बसवा.
- ज्या ठिकाणी घरामध्ये जास्त प्रमाणात कीटक येतात त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर घालून ठेवा
- कपाटात किडे होऊन त्यासाठी घरामध्ये लवंग ठेवा
- उरलेलं अन्न खरखट हे उघड्यावर ठेवू नका त्यामुळे घरात झुरळांची पैदास वाढते.
मीठ आणि लिंबू
तुम्ही दररोज घरामध्ये फरशी पुसत असताना दोन गोष्टी जर त्यामध्ये ऍड केल्यात तर घरामध्ये कीटक येणार नाहीत. फरशी पुसत असताना एका बादलीमध्ये पाणी घ्या त्यात एक चमचा मीठ आणि लिंबाचा रस मिसळा हे पाणी वापरून लादी पुसल्याने किडे फरशीवर दिसणार नाहीत. या व्यतिरिक्त एक कप पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्यात मीठ घाला. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि फरशी पुसल्यानंतर भिंती आणि फरशांवर शिंपडा त्यामुळे किडे दूर होतील.
काळी मिरी
मसाल्याच्या पदार्थांमध्ये वापरली जाणारी काळी मिरी फरशी पुसण्यासाठी तुम्ही वापरू शकता. फरशीवर काळी मिरी पूड घालून तुम्ही फरशी स्वच्छ करू शकता त्यासाठी एका पाणी घ्या आणि त्या मध्ये एक चमचा काळी मिरीची पावडर घाला. हे पाणी व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यानंतर फरशी पुसा फरशी स्वच्छ होईल शिवाय काळ्या मिरीच्या वासामुळे किडे दूर पळून जातील.
व्हिनेगर आणि बेकिंग सोडा
व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचा वापर करून तुम्ही फरशी पुसू शकता फरशीवर कीटक येणार नाहीत. यासाठी एक चमचा व्हिनेगर घ्या त्यामध्ये बेकिंग सोडा घालून फरशीच्या पाण्यात घालून फरशी पुसून घ्या.