Cleaning Tips : पावसाळा आला म्हंटल की आजुबाजुचा खुलणारा हिरवागार निसर्ग , उंचावरून कोसळणारे जलप्रपात , गरमागरम कांदाभजी, चहा चा आस्वाद घेणे म्हणजे आहाहा …! पण पावसाळा अनेक आजार आणि अनेक नकोशा गोष्टी सुद्धा घेऊन येतो. पावसाळया नकोशी वाटणारी गोष्ट म्हणजे बुरशी.
पावसाळ्यात भिंती लाकूड एव्हढेच काय कपड्यांवर सुद्धा बुरशी येते. पावसाळयाच्या दिवसात पुरेसे ऊन नसल्यामुळे हवा कोंदट होऊन घरात कुबट वास यायला लागतो. शिवाय किचनच्या ट्रॉली मधून देखील कुबट वास येतो. मग हा वास कसा घालवायचा ? यासंबंधीच्या काही ट्रिक्स (Cleaning Tips) आपण पाहुयात…
- पावसाळ्याच्या दिवसात दररोज रात्री झोपण्यापूर्वी ट्रॉल्या उघडून ठेवा, रात्रीच्या वेळी त्यातून थोडी मोकळी हवा जाऊ द्या, जेणेकरून बंदिस्त जागेतला कोणत वास निघून जायला मदत होईल.
- पावसाळ्यात दर पंधरा दिवसांनी ट्रॉली बाहेर काढून घ्या आणि ती जागा (Cleaning Tips) घासून, पुसून स्वच्छ करा. ती जागा पुसताना पाण्यात थोडं विनेगर घाला. यामुळे कोंदटपणा कमी होईल.
- किचन ट्रॉली मध्ये येणारा कोंदट वास घालवण्यासाठी तुम्ही डांबर गोळ्यांचा वापर करू शकता.
- रात्रीच्या वेळी लिंबाचे काप करा आणि त्यावर थोडा बेकिंग सोडा टाकून ते ट्रॉलीच्या आत मध्ये ठेवून द्या. त्यामुळे कोंदट वास (Cleaning Tips) निघून जायला मदत होईल.
- एक चांगला उपाय म्हणजे उदबत्तीचे रिकामे पुडे हे तुम्ही ट्रॉलीच्या खाली जमिनीवर ठेवू शकता. यामुळे दुर्गंधी (Cleaning Tips) कमी होऊन ती जागा सुगंधित होईल.