Cleaning Tips : हॉटेलच्या टॉवेलसारखे चमकतील घरचे टॉवेल ; साफ करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cleaning Tips : टॉवेल ही रोजच्या वापरातली गोष्ट आहे. टॉवेल ही अशी वस्तू आहे जी आपण रोजच्या रोज वापरत असतो आणि ती स्वच्छ ठेवायला हवी. पण बऱ्याचदा हे टॉवेल काळे कुट्ट झालेले असतात. शिवाय या टॉवेल्स ना डाग पडून अनेकदा दुर्गंधी यायला लागते. विशेषतः पावसाळ्यामध्ये टॉवेल चांगले वाळले नसल्यामुळे कुबट वास यायला लागतो. म्हणूनच आज आम्ही असे काही टिप्स तुम्हाला सांगणार (Cleaning Tips) आहोत ज्याच्यामुळे तुमचे टॉवेल हे हॉटेल मधल्या टॉवेल सारखे चकचकीत दिसतील

गरम पाणी (Cleaning Tips)

टॉवेल नेहमी गरम पाण्यात धुवावे. गरम पाणी घाण आणि बॅक्टेरिया सहजपणे काढून टाकते. एवढेच नाही तर कपडे लवकर स्वच्छ होतात.

ब्लिच (Cleaning Tips)

जर तुम्हाला पांढरे टॉवेल धुवायचे असतील तर त्यासाठी ब्लिच वापरा. हे टॉवेल चमकदार ठेवण्यास ब्लीच मदत करते. शिवाय त्यामुळे बॅक्टेरिया ही नष्ट होतात. पण जर टॉवेल रंगीत असतील तर कृपा करून ब्लिच वापरू नका. कारण यामुळे कलर जाण्याची शक्यता असते. तुम्हाला कलर टॉवेलला ब्लीच वापरायचे असेल तर कलर सेफ ब्लिच वापरण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे.

व्हिनेगार

टॉवेल साफ केल्यानंतर शेवटी स्वच्छ धुण्यासाठी एक कप पांढरा व्हिनेगर घाला. व्हिनेगर टॉवेल (Cleaning Tips) मऊ करण्यास आणि कोणत्याही प्रकारचा वास जर येत असेल टॉवेलला तर तो काढून टाकण्यास मदत करते.

फॅब्रिक सॉफ्टनर

टॉवेल मऊ आणि जर तुम्हाला फ्रेश ठेवायचे असतील तर चांगल्या पद्धतीचं फॅब्रिक सॉफ्टनर वापरा (Cleaning Tips) आणि त्यामुळे तुमचे टॉवेल फ्रेश आणि कायम सुगंधित राहतील

टॉवेल चांगले कोरडे करा.

खरंतर टॉवेलचे कापड हे जाड असल्यामुळे अनेकदा टॉवेल नीटसे वाळले जात नाहीत. शिवाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर टॉवेल चांगले वाळले जात नाहीत आणि त्यामुळे त्याला वास यायला लागतो. टॉवेल ड्रायर किंवा चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये वाळवायला विसरू नका.

बेकिंग सोडा (Cleaning Tips)

तुम्ही टॉवेल स्वच्छ करत असताना एक कप बेकिंग सोडा घाला. त्यामुळे टॉवेलचा दुर्गंध दूर होण्यास मदत होईल.