हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काल म्हणजेच 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. आणि त्यानंतर त्यांची पहिली पत्रकार परिषद देखील झालेली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक नवीन घोषणा केलेल्या आहेत. यामध्ये त्यांनी लाडकी बहिणीने बाबत देखील घोषणा केलेली आहे. विधानसभा निवडणूकीमध्ये महायुती सरकारला यावर्षी भरघोस यश मिळालेले आहे. आणि या यशामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा महत्वाचा वाटा आहे. मागील सरकारने या योजनेअंतर्गत 18 ते 60 वयोगटातील पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येईल असे सांगितले होते. परंतु जर या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले, तर ही रक्कम 1500 वरून 2100 रुपये करण्यात येईल. असे देखील आश्वासन महायुती सरकारने दिलेले होते.
पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहिणी योजनेबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही लाडकी बहिणी योजना सुरूच ठेवणार आहोत. महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देणार आहोत. या योजनेच्या बजेटचा आम्ही आढावा घेणार आहोत. त्याचप्रमाणे जी आश्वासने दिली होती. ती पूर्ण देखील करणार आहोत. त्याचप्रमाणे निकषाच्या बाहेर कोणी या योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्याचा फेरविचार करण्यात येईल. परंतु या योजनेचा सरसकट फेरविचार करण्याची घोषणा नाहीये. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांचाही ते सन्मान करणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे काही खात्यांचा प्रश्न शिल्लक आहे. त्याचा आम्ही एकत्र बसून तोडगा काढणार आहोत. असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेले आहे.