मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान; विरोधकांवरही साधला निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याची प्रक्रिया सुरु झाली असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी केलं आहे. आज बुलढाणा (Buldhana) येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जाहीर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर आणि जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचारावर भाष्य केलं. तसेच त्यांनी यावेळी विरोधकांवर सुद्धा निशाणा साधला.

एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आम्ही फक्त दाखवण्यसाठी काम करत नाही त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकार आणि आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच मराठा आंदोलकांवर लाठीमार केल्या प्रकरणी जालन्याच्या पोलीस अधीक्षकाला आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. गरज पडल्यास जालन्यातील घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल असंही एकनाथ शिंदे यांनी म्हंटल.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. ज्या लोकांनी मराठा आरक्षणाचे गळे घोटले, ते लोकं जालन्यात गळे काढायला गेले होते. अशोक चव्हाण तुम्ही तर त्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षण समितीमध्ये होता तेव्हा तुम्ही काय केलं, असा सवाल शिंदे यांनी अशोक चव्हाणांना लक्ष्य केलं. तर ज्यावेळी मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत होते. शांततेत मोर्चे निघत होते. यावेळी या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून संबोधलं हे जनता कधी विसरणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.