मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा मारली बाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटून गेले तरी अद्यापही पालकमंत्र्यांची (guardian minister ) यादी जाहीर झाली नव्हती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिंदे गटाला पालकमंत्री (guardian minister ) पदाच्या यादीत तरी जास्त जिल्हे मिळतील अशी शिंदे गटाच्या आमदारांना आशा होती. पण यात देखील पुन्हा एकदा देवेंद्र फडवणीस यांनी बाजी मारली आहे. त्यांना तब्बल सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली. यामध्ये देवेंद्र फडवणीस यांना नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री पद देण्यात आले.

पालकमंत्र्यांची (guardian minister ) यादी पुढीलप्रमाणे
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर,गोंदिया,
गिरीश महाजन – धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड – यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे – सांगली,
संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत – रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर,
अतुल सावे – जालना, बीड
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

पालकमंत्र्यांची (guardian minister ) ही यादी तात्पुरती?
अखेर तीन महिन्यानंतर पालकमंत्र्यांची (guardian minister ) ही यादी जाहीर करण्यात आली. परंतु ही यादी पुढच्या अडीच वर्षासाठी जशी आहे तशीच राहण्याची शक्यता कमी वर्तवली जात आहे. कारण दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार जाहीर झाल्यानंतर नव्या मंत्र्यांना देखील काही जिल्ह्यांचे पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर