भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagatsingh koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने भगतसिंग कोश्यारी (bhagatsingh koshyari) यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे, काँग्रेसनेही राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला आहे.

यानंतर आता भगतसिंग कोश्यारी (bhagatsingh koshyari) यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराज आमचं दैवत आहेत, पिढ्यानपिढ्या दैवत राहील, त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल?
‘आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं म्हणत राज्यपालांनी गडकरी आणि पवारांची तुलना महापुरुषांशी केली. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले.

फडणवीसांची प्रतिक्रिया
‘जोपर्यंत पृथ्वीवर चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच असतील. आमचे हिरो छत्रपती शिवाजी महाराजच असतील, त्यामुळे यावर वाद व्हायचं कारण नाही, असं मला वाटतं. राज्यपाल्यांच्या (bhagatsingh koshyari) मनातही हे स्पष्ट आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे आदर्श कोणी असू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा कोणताही दुसरा अर्थ काढला जाऊ नये, असं मला वाटतं,’ असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय