हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मिलेनिया ट्रम्प यांच्या दिल्लीतील सरकारी शाळेच्या प्रस्तावित भेटीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा समावेश नाही आहे. आम आदमी पक्षाच्या सूत्रांच्या दाव्यानुसार केंद्र सरकारने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कार्यक्रमातून बाहेर केलं आहे. प्रस्तावित पहिल्या कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अमेरिकन फर्स्ट लेडीसमवेत शाळेच्या भेटीला येणार होते. 25 फेब्रुवारी रोजी मिलेनिया ट्रम्प दक्षिण दिल्लीतील एका सरकारी शाळेत हॅपीनेस क्लास पाहण्यासाठी जातील. आता मुख्यमंत्री आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री यांना या कार्यक्रमातून वगळण्यात आले. आपच्या सूत्रांनी सांगितले की, केंद्र सरकारने उपमुख्यमंत्र्यांना कार्यक्रमातून काढून टाकण्यास मुख्यमंत्र्यांना भाग पाडले.
मिलेनिया ट्रम्प यांच्या या भेटीपूर्वी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीच्या सरकारी शाळेतल्या हॅपीनेस वर्गाचा आढावा घेतला आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
मनीष सिसोदिया म्हणाले, ”हॅपीनेस क्लासचे जेव्हा कौतुक होते त्यावेळी मी सुद्धा हैप्पी होतो. दीड वर्षापूर्वी याची सुरुवात झाली. यामुळे, मुलांमध्ये त्यांच्या पालकांबद्दल प्रेम निर्माण होत आहे, विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती चांगल्या भावना जन्माला येत आहेत. त्यांचे अभ्यासाकडे लक्ष वाढत आहे आणि मुलांचे वेगळे व्यक्तिमत्व तयार होत आहे.”
मिलेनिया शाळा भेटीबाबत सिसोदिया म्हणाले, “मिलेनिया ट्रम्प यांच्या भेटीसाठी आमच्याकडे त्यांनी याबाबत विनंती केली होती. त्यावर आम्ही, तुम्हाला यायचे असेल तर तुमचे स्वागतच आहे असं कळविले होते. त्यांच्या भेटीसाठी काही शाळांमध्ये व्यवस्था देखील पाहिली गेली आहे, परंतु मिलेनिया कोणत्या शाळेला भेट देणार आहेत आणि त्याची तयारीची स्थिती काय आहे किंवा त्यांच्या आगमनाची स्थिती काय आहे, याविषयी मी सध्या कोणतेही भाष्य करणार नाही, यामागे सुरक्षेच कारण देखील आहे. त्यांचा दिल्ली दौरा संपूर्णपणे भारत सरकारच्या देखरेखीखाली परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या देखरेखीखाली होत आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.