CNG कार चालवणार्‍यांसाठी आनंदाची बातमी! आज रात्रीपासून दरात झाला मोठा बदल..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे वाढत्या महागाईने जनता होरपळत असताना आता मात्र सर्वसामान्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल इंडियाची उपकंपनी महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने त्यांच्या वितरण क्षेत्रांमध्ये CNG आणि PNG च्या किमती कमी केल्या आहेत. त्यानुसार सीएनजीच्या दरात किलोमागे ८ रुपये आणि पीएनजीच्या दरात ५ रुपये प्रति एससीएम कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज म्हणजे 7 एप्रिल 2023 पासून या किमतीत बदल झाला आहे. या निर्णयामुळे CNG गाडी चालवणाऱ्याना मोठा दिलासा मिळाला आहे.

CNG आणि PNG च्या किमती कमी झाल्यामुळे मुंबईत आता सीएनजीची किंमत 79 रुपये प्रति किलो झाली आहे. तर दुसरीकडे पाइप्ड नॅचरल गॅस (PNG ) च्या किमती 5 रुपये प्रति एससीएमने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यानंतर त्याची किंमत 49 रुपये प्रति एससीएम झाली आहे. खर तर MGLने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्येही CNG च्या दरात प्रति किलो 2.5 रुपयांची कपात केली होती. मात्र असे असूनही एप्रिल २०२२ च्या तुलनेत आत्तापर्यंत CNG च्या किमती सुमारे ८० टक्क्यांनी जास्त आहेत.

दरम्यान, सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केल्याने देशातील सीएनजी आणि पीएनजी या दोन्ही वापरकर्त्यांना काही प्रमाणात का होईन परंतु दिलासा मिळाला आहे. सरकारचे हे पाऊल घरगुती आणि वाहतूक क्षेत्रात नैसर्गिक वायूचा वापर वाढविण्यात मदत करेल, असं MGLने म्हटले आहे.