हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन CNG And PNG Rate Cut । नवीन वर्षात देशातील सर्वसामान्य जनतेला मोठं गिफ्ट मिळणार आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) अधिकृतपणे गॅस दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, १ जानेवारी २०२६ पासून CNG आणि घरगुती पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG ) च्या किमती प्रति युनिट २ ते ३ रुपयांनी कमी होतील. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे सीएनजी किमती कमी झाल्याने थोडाफार का होईना आनंद सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल.
पीएनजीआरबीचे सदस्य ए. के. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यानुसार असलेली कर रचना आणि नवीन एकत्रित दर पद्धतीमुळे ग्राहकांची मोठी बचत होणार आहे. यापूर्वी दर निश्चित करण्यासाठी तीन झोन होते, ते आता कमी करून दोन करण्यात आले आहेत. २०२३ च्या प्रणालीअंतर्गत हे तीन विभागात विभागले होते. २०० किलोमीटपर्यंत ४२ रुपये, ३००० ते १२००० किमीसाठी ८० रुपये तर १२०० किमीपेक्षा जास्त अंतरासाठी १०७ रुपये ठरवून देण्यात आले होते. मात्र आता फक्त २ झोन असतील. CNG And PNG Rate Cut
पहिल्या झोनसाठी दर आता ५४ रुपये – CNG And PNG Rate Cut
सीएनजी आणि घरगुती पीएनजी ग्राहकांसाठी यातील पहिला झोन देशभरात लागू असेल. पहिल्या झोनसाठी दर आता ५४ रुपये निश्चित करण्यात आला आहे, यापूर्वी हा दर ८० रुपये आणि १०७ रुपये होता, त्यामुळे या किमती मोठ्या प्रमाणावर आता कमी झाल्याचे दिसतंय. या नवीन दर रचनेमुळे देशात कार्यरत असलेल्या ४० शहरी गॅस वितरण कंपन्यांद्वारे समाविष्ट असलेल्या ३१२ भौगोलिक क्षेत्रातील ग्राहकांना फायदा होईल. या समायोजित दराचे फायदे ग्राहकांना दिले जातील आणि नियामक यावर सक्रियपणे लक्ष ठेवेल. या व्यवसायात ग्राहक आणि ऑपरेटर यांचे हित संतुलित करणे ही आमची भूमिका आहे. असे तिवारी यांनी म्हंटल. एकूणच सांगायचे तर, ‘पीएनजीआरबी’ने घेतलेला हा निर्णय मध्यमवर्गीयांच्या जीवनात मोठा दिलासा देणारा ठरला आहे. एकीकडे स्वयंपाकघरातील खर्च कमी झाल्यामुळे गृहिणींना आणि दुसरीकडे इंधन खर्च स्वस्त झाल्यामुळे वाहनधारकांच्या पैशाची मोठी बचत यानिमित्ताने होणार आहे.




