मतदान होताच सर्वसामान्यांना मोठा झटका; इंधनाच्या दरात मोठी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. महाराष्ट्र सोबत झारखंड या राज्यातील देखील विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकाच टप्प्यात मतदान पूर्ण झालेले आहे. तर झारखंडमध्ये 20 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान पूर्ण झालेले आहे. हे मतदान झाल्यानंतर जवळपास 24 तासातच इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहेत. आज मध्यरात्रीपासून सीएनजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे. याबाबतची माहिती महानगर गॅस लिमिटेड यांनी दिलेली आहे.

इतक्या रुपयांनी गॅस महाग

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी दरामध्ये वाढ झाल्याची माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आज पासून सीएनजीच्या किमती दोन रुपयांनी वाढलेल्या आहेत. यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये सीएनजीचे दर हे 77 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचलेले आहे. त्यामुळे आता रिक्षा चालकांच्या खिशाला देखील खात्री लागणार आहे.

सीएनजी दरात वाढ झाल्याने दुसरीकडे शेअर बाजारामध्ये देखील मोठी हालचाल दिसून येत आहे. महानगर गॅस शेअर मध्ये 3 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. म्हणजेच महानगर गॅसचा शेअर हा 100 रुपयांच्या रेंजमध्ये असणार आहे. सरकारने सलग दुसऱ्या महिन्यामध्ये शहरातील गॅस वितरण कंपन्यांसाठी ऍडमिनिस्टर प्राईस मेकॅनिझम ए लोकेशन मध्ये 20 टक्क्यांनी कपात केलेली आहे. यामुळेच एमजीएल आणि आयजीएल सारख्या कंपन्यांची नफ्यामध्ये परिणाम झालेला आहे.