हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (CNG Price Down) जगभरात महागाईने कहर केला आहे. साधे चणे खायचे म्हटले तरी दहावेळा विचार करावा लागतो. ही महागाई दिवसेंदिवस हातपाय पसरतेय आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडतेय. सध्या भारतातील महागाई दर हा सुमारे ४.८७ टक्के इतका आहे. परिणामी पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांसारख्या इंधनांचे दर काहीच्या काही वाढलेत. आजकाल प्रत्येकाकडे स्वतःची गाडी असते. त्यामुळे इंधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात इंधनांचे वाढते दर सामान्य माणसाला घाम फोडणारे ठरत आहेत. अशातच एक किंचित दिलासा देणारी चांगली बातमी समोर आली आहे.
मंगळवारी राज्य संचालित महानगर गॅस अर्थात MGL ने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसची किंमत प्रति किलो २.५ रुपयांनी कमी केली आहे. (CNG Price Down) यानुसार आता कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसची किंमत ७३.५० रुपये प्रति किलो इतकी करण्यात आल्याचे समजत आहे. इतकेच नव्हे तर, या परिस्थितीत CNG गॅस हा पेट्रोल दराच्या तुलनेत ५३ % तर डिझेल दरापेक्षा २२ टक्क्यांनी स्वस्त झाल्याचे स्पष्ट होत आहे. चला तर जाणून घेऊया MGL कंपनीने CNG गॅसचे दर का कमी केले आणि याचा परिणाम काय होईल?
CNG चा दर कमी होण्याचे कारण.. (CNG Price Down)
एका वृत्तानुसार MGL कंपनीने एक निवेदन जाहीर केले आहे. या निवेदनात कंपनीने आपल्या निर्णयाबाबत माहिती स्पष्ट केली आहे. यामध्ये कंपनीने म्हटले आहे की, गॅस इनपुट खर्चात घट झाल्यामुळे ५ मार्चच्या मध्यरात्रीपासून CNG गॅसच्या किंमती कमी केल्या जात आहेत.
सध्या आर्थिक राजधानीत आत्ताच्या किंमत पातळीवर CNG च्या किंमती या पेट्रोल दराच्या तुलनेत ५३% आणि डिझेल दराच्या तुलनेत २२% स्वस्त झाल्या आहेत. (CNG Price Down) यामुळे आता सीएनजीच्या किमतीत झालेली कपात स्पष्ट आहे. दरम्यान सीएनजीचे दर कमी झाल्यामुळे साहजिकपणे नैसर्गिक वायूचा वापर वाढण्यास मदत होईल. ही बाब देशाच्या हिताची ठरेल. अर्थात भारत स्वच्छ आणि हरित बनवण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे, असे म्हणायला हरकत नाही.
देशाच्या राजधानीत CNG ची किंमत किती?
दिल्ली ही भारताची राजधानी आहे. त्यामुळे कोणत्याही निर्णयाचा मोठा प्रभाव हा दिल्लीवर पडत असतो. सध्या, MGL ने CNG गॅसच्या किंमती कमी केल्या आहेत. यानुसार, आता दिल्लीमध्ये सीएनजीची किंमत ७६.५९ रुपये प्रति किलो इतकी झाली आहे. अर्थात देशाची राजधानी आता स्वच्छ आणि हिरवीगार ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ही बाब अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
सीएनजी हे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने चांगले इंधन मानले जाते. तथापि, इलेक्ट्रिक वाहनांच्या आगमनाने साहजिकपणे प्रदूषणात घट अपेक्षित आहे. माहितीनुसार, दिल्लीमध्ये आत्ताच्या घडीला पेट्रोलचा प्रति किलो दर हा ९६.७२ रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रति किलो इतका आहे. (CNG Price Down)