Coimbatore Cricket Stadium : भारतातील ‘या’ शहरात उभारण्यात येणार जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Coimbatore Cricket Stadium । आपला भारत हा क्रिकेटप्रेमी देश… देशात क्रिकेटला एखाद्या धर्माप्रमाणे मानाचे स्थान आहे. जसे देशात एकामागून एक दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे त्याचप्रमाणे भारतात क्रिकेट स्टेडियमची सुद्धा काही कमी नाही. देशात जवळपास 52 क्रिकेट स्टेडियम आहेत. यातील गुजरात मधील नरेंद्र मोदी स्टेडियम सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये 132,000 लोक बसण्याची क्षमता आहे. मात्र आता तामिळनाडू येथील कोईम्बतूरमध्ये भारतातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे. तामिळनाडू सरकारने हे मोठे स्टेडियम बांधण्याची आपली योजना जाहीर केली आहे.

सध्या तामिळनाडू मध्ये एमए चिदंबरम स्टेडियम हे एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे. हे स्टेडियम चेन्नई मध्ये आहे. आता त्यानंतर कोईम्बतूरमध्ये सर्वात मोठं स्टेडियम उभारण्याचा (Coimbatore Cricket Stadium) सरकारचा प्लॅन असून हे दुसरं आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम ठरेल. क्रिकेटच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी तामिळनाडू सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्याचे उद्योगमंत्री टीआरबी राजा आणि युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे दोन मंत्री यात आघाडीवर असून तामिळनाडूमध्ये खेळांना प्रोत्साहन आणि कलागुणांना वाव देण्यावर भर दिला जात आहे.

काय सुविधा मिळणार? Coimbatore Cricket Stadium

हे नवीन स्टेडियम NH 544 वर कोईम्बतूर शहरापासून सुमारे 16 किमी अंतरावर उभारण्यात येणार आहे . स्टेडियममध्ये व्हीआयपी आणि कॉर्पोरेट सुविधा, खेळाडूंसाठी लाउंज, मीडिया सेंटर, सार्वजनिक कॅफेटेरिया, रेस्टॉरंट्स आणि क्रिकेट संग्रहालय यासह अत्याधुनिक सुविधा असतील. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियम, बेंगळुरूचे एम चिन्नास्वामी स्टेडियम आणि लंडनच्या लॉर्ड्स स्टेडियमच्या धर्तीवर या स्टेडियमची रचना असेल असं बोलले जातंय. जगातील सरावात मोठं स्टेडियम असल्याने त्याचा थाट हा वेगळाच असेल. आता या स्टेडियमचे बांधकाम कधी सुरू होते आणि ते कधी पूर्ण होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

चेपॉक स्टेडियम खूप जुनं –

सध्याचे तामिळनाडू येथील एमए चिदंबरम स्टेडियम खूप जुने आहे. हे स्टेडियम 1916 मध्ये उभारण्यात आलं होते. या स्टेडियममध्ये सुमारे 50,000 लोक बसण्याची क्षमता आहे. कोलकात्याच्या ऐतिहासिक अशा ईडन गार्डन्सनंतर भारतातील दुसरे सर्वात जुने क्रिकेट स्टेडियम म्हणून एम ए चिंदंबरम क्रिकेट स्टेडियम ओळखलं जाते. याठिकाणी आत्तापर्यंत एकूण 34 कसोटींखेळवण्यात आल्या आहेत. 1934 मध्ये येथे पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला, जो भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना होता. इंग्लंडने हा सामना 202 धावांनी जिंकला होता.