किराणा दुकानातही मिळणार सर्दी-खोकल्याची औषधे; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सर्दी-खोकला (Cold and Cough) असो किंवा कोणतेही मोठे आजार असोत त्याची औषधे आपल्याला मेडिकलमध्ये जाऊनच विकत घ्यावी लागतात. परंतु आता किराणामालाच्या दुकानांमध्ये (Grocery Stores) देखील सर्दी, खोकला, ताप या आजारांवरील औषध मिळणार आहेत. कारण की, केंद्र सरकार ओटीसी म्हणजेच ओव्हर द काउंटर औषधांसाठी धोरण आणण्याचा विचार करत आहे. यासाठी एक समिती ही स्थापन करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्दी खोकल्याच्या औषधासाठी मेडिकलमध्ये जावे लागणार नाही.

OTC धोरण म्हणजे नेमके काय?

ओव्हर द काउंटर (OTC) म्हणजे अशी औषधे जे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देखील सहज विकत घेता येऊ शकतात. सध्या हे धोरण अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये लागू आहे. आता याच धोरणाची अंमलबजावणी केंद्र सरकार भारतामध्ये देखील करण्याच्या तयारीत आहे. हे धोरण लागू करण्यासाठी केंद्र सरकारकडून तशी पावले उचलण्यात आली आहेत. या धोरणासंदर्भातील काम स्थापित करण्यात आलेली समिती करत आहे. आजवर या समितीकडून अनेक त्रुटी आणि बदल सांगण्यात आले आहेत. यावरच सरकार काम करत आहे.

धोरण आणण्याचे कारण काय?

केंद्र सरकार हे धोरण ग्रामीण भागाला डोळ्यासमोर ठेवून आणण्याचा विचार करत आहे. कारण की ग्रामीण भागामध्ये मेडिकलची संख्या खूप कमी प्रमाणात असते. यामुळे अनेक वेळा हवी असलेली औषधे वेळेत मिळत नाहीत. असे झाल्यामुळे रुग्णांची प्रकृती जास्त खालावत जाते. अशा घटना वारंवार घडू नये आणि कोणत्याही रुग्णाला वेळेत औषधे मिळावी यासाठी केंद्र सरकार OTC धोरण आणण्यावर काम करत आहे. हे धोरण आल्यास कोणत्याही किराणामालाच्या दुकानात सर्दी, खोकला किंवा ताप या आजारावरील औषधे लगेच मिळून जातील.