कपिल शर्माची Zwigato ची प्रदर्शनाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉमेडियन म्हणून ओळख असलेल्या कपिल शर्माचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘Zwigato’ ची रिलीज डेट नुकतीच जाहीर झाली आहे. हा चित्रपट यावर्षी 17 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. कपिलने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.या चित्रपटात कपिल एका डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे.

डिलिव्हरी बॉयच्या आयुष्यावर असलेल्या या Zwigato चे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शिका नंदिता दास यांनी केले आहे. प्रतिष्ठित टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये कपिलच्या झ्विगाटो चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.

Poster of Kapil Sharmas Zwigato

कपिलनंतर Applause Entertainment च्या अधिकृत हँडलने देखील Instagram वर बाईक चालवणाऱ्या कपिल शर्माच्या पात्राचे एक मोशन पोस्टर शेअर केले आहे. आणि “वर्षातील सर्वात प्रतीक्षित ऑर्डर शेवटी आली आहे ! Zwigato, असे त्याला कॅप्शन दिले आहे. डिलिव्हरीबद्दल फूड एक हृदयस्पर्शी कथा राइड स्टार कपिल शर्मा आणि शहाना गोस्वामी, नंदिता दास लिखित आणि दिग्दर्शित आहे.

https://www.instagram.com/reel/CnoJxJnBWhy/?utm_source=ig_web_copy_link

टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात World Premiere

कपिलने चित्रपटाच्या पोस्टरसह ट्विटरवर ही बातमी शेअर केली आहे आणि त्यामध्ये लिहले आहे की, Applause Entertainment आणि नंदिता दास इनिशिएटिव्ह 47 व्या टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये झ्विगाटोचा वर्ल्ड प्रीमियर होत असल्याची घोषणा करताना अभिमान वाटतो.

कपिल शर्मा डिलिव्हरी फूड रायडरच्या भूमिकेत दिसणार

Zwigato मध्ये कपिल शर्मा डिलिव्हरी फूड रायडरच्या भूमिकेत दिसणार आहे. कपिलच्या पत्नीच्या भूमिकेत शहाना गोस्वामी आहे. शहानाचे पात्र एका गृहिणीचे आहे, जी कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी पहिल्यांदाच काम करू लागली आहे. चित्रपटाची कथा भुवनेश्वर शहर आहे आणि साथीच्या रोगानंतर एका सामान्य कुटुंबाच्या संघर्षाची कथा सांगते.