हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Commerce Ministry Recruitment 2024 नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता त्यांचा नोकरीचा शोध संपणार आहे. कारण आता तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. आणि अशीच एक संधी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करा. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील जाहीर केलेली आहे. अप्पर डिव्हिजनल लिपिक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवलेली जात आहे. आता या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
या भरती अंतर्गत तुम्हाला थेट वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात नोकरी (Commerce Ministry Recruitment 2024) करण्याची संधी मिळणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय अंतर्गत ही भरती राबवली जाणार आहे. लिपिक या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरच त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
रिक्त पदाचे नाव
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांच्या अंतर्गत लिपिक या पदासाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
रिक्त पदसंख्या | Commerce Ministry Recruitment 2024
लिपिक या पदासाठी 21 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
झोनल अप्पर डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडचे कार्यालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय शास्त्रीभवन संलग्नक, हेजेस रोड, नुंगमबक्कम चेन्नई येथे पाठवावा लागेल.
या भरती अंतर्गत तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागणार आहे. ती परीक्षा पास झाल्यानंतरच तुमची या भरती अंतर्गत निवड केली जाईल. तुम्हाला हा अर्ज ऑनलाइन त्याचप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने देखील भरायचा आहे. अधिकृत वेबसाईटला भेट देऊन हा अर्ज भरायचा आहे त्याचप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर देखील अर्ज पाठवायचा आहे.