Good News!! LPG गॅस सिलिंडर झाला स्वस्त; पहा नवीन दर किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 1 एप्रिल असून आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. एप्रिलच्या सुरुवातीला जनतेला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आजपासून LPG गॅस सिलिंडरच्या किमती 91.50 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. मात्र घरगुती गॅस सिलिंडरसाठी नव्हे तर फक्त व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ही कपात करण्यात आली आहे.

वास्तविक, पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी, एटीएफ, केरोसीन तेल इत्यादींच्या किमतींचा आढावा घेतात आणि त्यात बदल करतात. त्यानुसार आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 91.50 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या सर्व शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. मात्र 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

91.50 रुपयांनी व्यावसायिक LPG गॅस सिलिंडर स्वस्त झाल्यामुळे आता राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरची किंमत 2028 रुपये, कोलकात्यात 2132 रुपये, मुंबईत 1980 रुपये आणि चेन्नईमध्ये 2192.50 रुपये झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती आहे तशाच आहेत. दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1,103 रुपये आहे. कोलकात्यात 1,129 रुपये, मुंबईत 1102.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1118.50 रुपये आहे.