भारताला मोठा धक्का ! नीरज चोप्राची Commonwealth Games मधून माघार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बर्मिंगहॅममध्ये सुरू होणारी कॉमनवेल्थ स्पर्धा (Commonwealth Games) काही दिवसांवर आली असताना भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा नंबर 1 अ‍ॅथेलिट नीरज चोप्राने या स्पर्धेतून (Commonwealth Games) माघार घेतली आहे. डॉक्टरांनी नीरजला 20 दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्याने हि माघार घेतली आहे.

नीरजनं मागच्या वर्षी टोकयो झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धत गोल्ड मेडल पटकावले होते. त्याचबरोबर नुकत्याच अमेरिकेतील वर्ल्ड अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावले होते. या कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये (Commonwealth Games) नीरज गोल्ड मेडलचा प्रबळ दावेदार होता. या स्पर्धेत माघार घेतल्यामुळे भारताचे एक गोल्ड मेडल कमी झाले आहे. बर्मिंगहॅममध्ये 28 जुलै ते 7 ऑगस्टदरम्यान या कॉमनवेल्थ स्पर्धा (Commonwealth Games) घेण्यात येणार आहेत.

टोकयो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरजनं दोन दिवसांपूर्वीच ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यानं (Commonwealth Games) वर्ल्ड अ‍ॅथेलेटिक्स भालाफेक स्पर्धेत सिल्वर मेडल जिंकून भारताला तब्बल 19 वर्षांनी मेडल मिळवून दिले. अंजू बॉबी जॉर्जने 2003 साली पॅरिसमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताला मेडल मिळवून दिले होते.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!