Saturday, March 25, 2023

पोवई नाक्यावर नग्न अवस्थेत युवकाचा राडा

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहर परिसरातील पोवई नाका येथे एका युवकाने नग्न अवस्थेत गोंधळ घातल्याने एकच खळबळ उडाली. युवकाच्या या पवित्र्यामुळे नागरिक, महिलांची तारांबळ उडाली. रस्त्यावरच सुमारे अर्धा तास नग्न युवक उड्या मारत राहिल्याने अखेर पोलिस व काही नागरिकांनी त्याला पकडून कपडे घालत सिव्हीलमध्ये दाखल केले.

- Advertisement -

याबाबत प्राथमिक माहिती अशी, गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. एक युवक अंगावर कोणतेही वस्त्र न घालता पळत सुटला होता. वर्दळीच्या व मुख्य रस्त्यावर हा प्रकार सुरु झाल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी काही नागरिकांना हाताशी धरुन त्या युवकाला ताब्यात घेतले.

संबंधित युवकाला कपडे घालून त्याच्यावर उपचार करण्यासाठी सिव्हीलमध्ये नेण्यात आले. दरम्यान, ही घटना घडत असताना बघ्यांची गर्दी उसळली होती. तसेच युवक मोठमोठ्याने अोरडत असल्याने लोकांचे लक्ष त्याच्याकडे जात होते. नग्न अवस्थेतील युवकामुळे महिला वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला.