पंतप्रधान मोदींशी पंगा घेणे राऊतांना पडले महागात; भाजपच्या नेत्याने केली थेट तक्रार दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना चांगलेच भोवले आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट औरंगजेबाशी केल्यामुळे त्यांच्या विरोधात भाजपने मोठी कारवाई केली आहे. भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता संजय राऊतांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकतात.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून संजय राऊत हे भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट औरंगजेबाशी केली होती. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळेच भाजपचा कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्या जोरदार टीकाही होत आहे. परंतु आता दुसऱ्या बाजूला विवेकानंद गुप्ता यांनी संजय राऊतांविरोधात थेट तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, “महाराष्ट्रात छत्रपती शिवराय जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आहे, त्याच्या बाजूला दाहोद नावाच्या गावात औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीवरून महाराष्ट्रावर चाल करुन येत आहे. दोघांची विचारसरणी सारखीच आहे” अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींची नाव औरंगजेबाशी केली होती. सध्या राऊतांच्या याच वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे.