व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

हिंदू संघटनांकडून प्रकाश राज यांच्या विरोधात तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चांद्रयान-3 मिशनबाबत केलेल्या ट्विटमुळे अभिनेते प्रकाश राज यांच्यावर कर्नाटकातील बागलकोट येथील बनहट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदू संघटनांच्या नेत्यांनी प्रकाश राज यांच्या विरोधात हि तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता प्रकाश राज यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच प्रकाश राज यांनी चांद्रयान-3 मिशनविषयी एक ट्विट केले होते. ज्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर आता प्रकाश राज यांच्यावर थेट तक्रार दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश राज यांच्या विरोधात तक्रार दाखल

ANI ने दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश राज यांनी चांद्रयान-3 मिशनबाबत मिश्किल ट्वीट केल्यामुळे त्यांच्यावर हिंदू संघटनांनी आक्रमकची भूमिका घेतली आहे. या ट्वीटमुळे आता प्रकाश राज यांच्यावर बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणी त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील हिंदू संघटनांनी केली आहे. यामुळे आता याबाबत प्रकाश राज काय भूमिका घेतील हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

चांद्रयान-3 मिशनबाबत ट्विट

गेल्या दोन दिवसांपूर्वी प्रकाश राज यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शर्ट आणि लुंगी घातलेल्या चहा विक्रेत्याची कार्टून इमेज शेअर केली होती. या इमेजला कॅप्शन देत त्यांनी ‘ब्रेकिंग न्यूज, चंद्रावरून विक्रम लँडरने पाठवलेला पहिला फोटो… व्वा… justasking…’ असे म्हणले होते. ज्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. तर “प्रकाश राज यांनी ट्वीटच्या माध्यमातून देशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या चांद्रयान-3ची मस्करी केली” असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. मात्र हे प्रकरण जास्त तापल्यानंतर प्रकाश राजे यांनी ट्वीटसंदर्भात स्पष्टीकरण दिले.

ट्विटसंदर्भात स्पष्टीकरण

आपल्यावर होत असलेल्या ठिकाणबाबत आणि केलेल्या ट्विटविषयी स्पष्टीकरण देत, ‘द्वेष करणाऱ्यांना फक्त द्वेषच दिसतो. मी आर्मस्ट्राँगच्या काळातील विनोदाचा संदर्भ देत होतो. आमच्या केरळ चायवालाबद्दल बोलत होतो. कोणता चायवाला ट्रोलर्सनी पाहिला? जर तुम्हाला विनोद कळत नसेल तर हा जोक तुमच्यासाठीच आहे. GROW UP’ असे प्रकाश राज यांनी म्हटले आहे.