हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा (Finicial Year) शेवटचा महिना असल्यामुळे या कालावधीत काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे अत्यंत गरजेची आहेत. अन्यथा 1 एप्रिल 2025 पासून तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. हा आर्थिक फटका बसू नये म्हणून कोणती कामे करणे आवश्यक आहेत त्वरित जाणून घ्या.
PPF आणि SSY योजनेत गुंतवणूक अनिवार्य – सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या योजना आहेत. यामध्ये किमान गुंतवणूक करणे आवश्यक असते. आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच ३१ मार्चपूर्वी या योजनांमध्ये कमीत कमी ठेवी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही हे काम वेळेत केले नाही तर खाते बंद केले जाऊ शकते.
टॅक्स सेव्हिंग गुंतवणूकीसाठी शेवटची संधी – जर तुम्हाला चालू आर्थिक वर्षातील कर बचत करायची असेल, तर ३१ मार्चपूर्वी काही योजनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. सेक्शन 80C अंतर्गत काही गुंतवणूक पर्यायांवर टॅक्स डिडक्शनचा लाभ मिळतो. या पर्यायांमध्ये ELSS म्युच्युअल फंड्स, सुकन्या समृद्धी योजना (SSY), राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) या योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही १.५ लाखांपर्यंतच्या रकमेवर टॅक्स बचत करू शकता.
सन्मान सेविंग गुंतवणुकीसाठी शेवटची संधी – महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजना ही केंद्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली विशेष योजना आहे. या योजनेत ७.५% व्याजदराने सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, ही योजना केवळ ३१ मार्च २०२५ पर्यंत लागू आहे. त्यामुळे, ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी ३१ मार्चपूर्वी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
अपडेटेड ITR भरण्यासाठी शेवटची तारीख – जर तुम्ही मागील वर्षी (AY 2022-23) आयकर विवरणपत्र (ITR) भरताना काही चूक केली असेल, तर ती सुधारण्याची ही शेवटची संधी आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत तुम्ही अपडेटेड आयटीआर भरू शकता. तसेच, जर तुम्ही २०२२-२३ मध्ये आयटीआर भरले नसेल, तर अतिरिक्त शुल्कासह ते भरता येईल.
दरम्यान, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्या भविष्यातील आर्थिक नियोजनावर अधिक भर द्या. तसेच, कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक करायची, याचा आढावा घ्या. यासह वर्षाच्या शेवटी घाई करण्याऐवजी सुरुवातीपासूनच नियोजन करा. तसेच, वेगवेगळ्या योजनांमध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक करून करबचत करा.