औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष झालं संपूर्ण शिक्षण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. शैक्षणिक सत्र ही विस्कळीत होते की काय असा प्रश्न पालकांमध्ये निर्माण झाला आहे. शासनाकडून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून सर्व विषयाची क्रमिक पाठ्यपुस्तके मोफत पुरवली जातात. गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना सुद्धा विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके शाळेकडून वितरित करण्यात आली होती. मात्र या वर्षी पाठ्य पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत.
विद्यार्थ्यांना ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. यावर्षी पुस्तकांची छपाई विलंबाने सुरू झाली. विद्यार्थ्यांनी मागील वर्षाची जुने पाठ्यपुस्तके शाळेत जमा करावी म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. पाठ्यपुस्तके वेळेवर मिळणार नसतील तर मग आधीच विस्कळीत झालेली शाळा आणि विद्यार्थ्यांचे अध्यायन कशा प्रकारे करायचे असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना मधून उपस्थित केला जात आहे.
जुन्या पुस्तकांचा होऊ शकतो उपयोग
जुनी पुस्तके मिळाली तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कळू शकते. त्यामुळे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागच्या वर्गाची पुस्तके शाळेत जमा केली तर दुसऱ्या विद्यार्थ्यांना मदत होऊ शकते. म्हणून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जुनी पुस्तकं शाळेमध्ये परत करावी.